गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध जवळील सशस्त्र दूरस्थ क्षेत्र धाबेपवणी येथील एका पोलीस हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरूवारी (१६ जानेवारी) दुपारच्या सुमारास घडली. जयराम कारू कोरेट (५०, रा. संबूटोला/कडीकसा ता. देवरी, जि. गोंदिया) बक्कल क्रमांक २४ असे आत्महत्या केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार नुकताच जयराम कारू कोरेट यांचे स्थानांतरण झाल्यामुळे आत्महत्या केली असावी, असा अंदाज त्याच्या मित्र मंडळी कडून मिळालेल्या माहिती वरून व्यक्त केला जात आहे. पण, पोलिस विभागाकडून सध्या आत्महत्येचे कारण गुलदस्तातच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगांव तालुक्यातील संवेदनशील नक्षलग्रस्त भागामध्ये नक्षल गतीविधी वर नजर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सशस्त्र दूरस्थ क्षेत्र (एओपी) बांधण्यात आल्या आहे. अशातच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध पोलीस स्टेशन जवळ असलेल्या धाबेपवनी येथील एओपी मधील पोलिस हवालदार पदावर कार्यरत जयराम कारू कोरेट यांनी आत्महत्या केल्याने एकच खडबड उडाली आहे. त्यांनी आपल्याजवळ असलेल्या एके४७ या बंदूकीने गोळी झाडत आत्महत्या केली. या घटनेचा तपास नवेगावबांध पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक योगिता चापले ह्या करीत आहे. विशेष बाब म्हणजे गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यात पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे.

हेही वाचा…चार हजार कि.मी. उड्डाण, पाच राज्यांतून प्रवास; तामिळनाडूत घेतला अखेरचा श्वास…

नोव्हेंबर २०२४ ला गोंदियातील बिर्सी विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या पोलिस शिपाई राकेश भांडारकर (रा. पदमपुर, ता. आमगाव) यांनी कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर त्यांच्या पत्नी यांनी कर्तव्यावर असताना विभागातील वरिष्ठ अधिकारी विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप केला होता. राकेश कर्तव्यावर असताना त्यांच्यासोबत घडत असलेले प्रसंग सांगत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. गुरूवारी जयराम कोरेट यांच्या आत्महत्येची घटना घडली. या प्रकरणाचा तपास नवेगावबांधच्या पोलिस निरीक्षक योगिता चाफले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. त्यात तपास अंती खरे कारण काय ते स्पष्ट होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police constable in dhabepavani an armed remote area near navegaonbandh in gondia district committed suicide by shooting himself sar 75 sud 02