नागपूर : लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी रेल्वेने जात असताना सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना विनयभंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळ मनमाड रेल्वेस्थानक असल्याने मनमाड जीआरपीकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी युवराज राठोड आणि आदित्य यादव या हवालदारांना निलंबित केले होते. मात्र, खाकी वर्दीतील पोलीस कर्मचारीच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहर पोलिसांच्या विविध पोलीस ठाण्यांतील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना पुण्याला निवडणूक बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले. हे सर्व जण विशेष रेल्वेगाडीने पुण्याला जात होते. दोन्ही पीडित महिला पोलीस कर्मचारी दुपारी साडेतीन वाजता मनमाड स्थानकाजवळील रेल्वेच्या दरवाजाजवळ उभ्या होत्या. त्याचक्षणी युवराज तिथे गेला व त्याने दोन्ही महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील शब्दाचा वापर करून त्यांचा विनयभंग केला. या घटनेनंतर एक पीडित महिला कर्मचारी त्यांच्या जागेवर जाऊन बसली. यानंतर युवराजही तेथे गेला व त्याने तिला शिवीगाळ केली. आदित्यनेही अश्लील हावभाव करत शिवीगाळ केली. इतर कर्मचाऱ्यांनी या घटनेची क्लिप बनविली.

हेही वाचा : प्रियकराची लग्नास ना; अन्य युवकांसोबत लग्न करण्यास मनाई, यामुळे तरुणीने…

पीडित महिला कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी महिला कर्मचारी व आरोपी कर्मचाऱ्यांना तातडीने नागपूरला बोलावले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करून दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

हेही वाचा : नागपूरमध्ये रेल्वेच्या जागेतील सर्वच जाहिरात फलक अवैध

पोलीस विभागाची प्रतिमा मलीन

पोलीस खात्याला शिस्तीचे खाते संबोधल्या जाते. सामान्य नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असते. खाकी वर्दीतील पोलीस कर्मचारी दिसताच महिलांच्या मनातील भीती नाहिसी होते. मात्र, आता दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्यांशीच अश्लील चाळे करीत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police constables molested female police personnel in a running train adk 83 css
Show comments