नागपूर: प्रेयसीच्या सहा वर्षाच्या मुलाला सिगारेटचे चटके देणाऱ्या युवकास वाडी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संकेत रमेश उत्तरवार (३२, वडधामना) असे आरोपीचे नाव आहे. करोनामध्ये पतीचे निधन झाल्यामुळे एक विधवा महिला आपल्या चार व सहा वर्षांच्या दोन मुलासह संकेतसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. दोन्ही मुले माझी नाही, असे म्हणत संकेत नेहमी त्यांचा छळ करायचा व मारायचा. त्यातूनच त्याने काही दिवसांअगोदर चार वर्षांच्या चिमुकल्याला लहानसहान गोष्टींवरून चटके देण्याची सुरुवात केली. तो सिगारेटचे चटके देत होता. या मुलांच्या वडिलांच्या आईला ही बाब एका ओळखीच्या व्यक्तीकडून कळाली व त्यानंतर तिने जाऊन खातरजमा केली. तिने वाडी पोलीस ठाण्यात संकेत विरोधात तक्रार केली.

हेही वाचा… मराठा आरक्षण क्रांती मोर्चा: बुलढाण्यात येणाऱ्या मार्गांवर तगडा पोलीस बंदोबस्त

पोलिसांनी संकेतविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला, अशी माहिती वाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police custody to man who harassed girlfriend son in nagpur dvr