लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर: बनावट ऑनलाईन गेमींग अ‍ॅप तयार करून हजारो ग्राहकांना कोट्यवधीने फसविणारा क्रिकेट बुकी अनंत ऊर्फ सोंटू जैन याच्या गोंदीयातील बँकेतील चार लॉकर पोलिसांनी मंगळवारी उघडले. या लॉकरमधून ४ कोटी रुपये किंमतीचे सोने आणि अडीच कोटी रुपये रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. दुबईत पळून गेलेल्या सोंटू जैनला जामीन मिळविण्यासाठी नागपुरातील काही क्रिकेट बुकींनी शक्ती पणाला लावली आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

नागपुरातील व्यापारी विक्रांत अग्रवाल याला जाळ्यात ओढून बनावट गेमींग अ‍ॅपच्या माध्यमातून ५८ कोटींनी फसवणूक केली होती. त्यामुळे अग्रवालने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोंटू अग्रवालच्या घरी छापा घालून १६ कोटींची रक्कम आणि सोने असा ५८ कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता.

हेही वाचा… अर्धनग्न अवस्थेत महिलेला मारहाण; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट

जैनचे चार बँक लॉकरची माहिती समोर येताच मंगळवारी गुन्हे शाखेने बँक लॉकर ताब्यात घेतले. लॉकरमध्ये ४ कोटी रुपये किंमतीचे सोने आणि अडीच कोटी रुपये रोख रक्कम सापडली. सोंटू जैनचे दुबईत क्रिकेट बेटिंगचे जाळे असून त्याने सट्टेबाजीसाठी नागपुरात अनेकांना ‘आयडी’ दिली आहे. तसेच छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थानमध्येसुद्धा क्रिकेट बेटिंगचे जाळे तयार केले आहे. सोंटू हा हवाल्याच्या माध्यमातून नेहमी व्यापार करीत होता. त्यामुळे पोलिसांच्या रडारवर जैनची आणखी संपत्ती आहे.

Story img Loader