लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर: बनावट ऑनलाईन गेमींग अॅप तयार करून हजारो ग्राहकांना कोट्यवधीने फसविणारा क्रिकेट बुकी अनंत ऊर्फ सोंटू जैन याच्या गोंदीयातील बँकेतील चार लॉकर पोलिसांनी मंगळवारी उघडले. या लॉकरमधून ४ कोटी रुपये किंमतीचे सोने आणि अडीच कोटी रुपये रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. दुबईत पळून गेलेल्या सोंटू जैनला जामीन मिळविण्यासाठी नागपुरातील काही क्रिकेट बुकींनी शक्ती पणाला लावली आहे.
नागपुरातील व्यापारी विक्रांत अग्रवाल याला जाळ्यात ओढून बनावट गेमींग अॅपच्या माध्यमातून ५८ कोटींनी फसवणूक केली होती. त्यामुळे अग्रवालने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोंटू अग्रवालच्या घरी छापा घालून १६ कोटींची रक्कम आणि सोने असा ५८ कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता.
हेही वाचा… अर्धनग्न अवस्थेत महिलेला मारहाण; अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट
जैनचे चार बँक लॉकरची माहिती समोर येताच मंगळवारी गुन्हे शाखेने बँक लॉकर ताब्यात घेतले. लॉकरमध्ये ४ कोटी रुपये किंमतीचे सोने आणि अडीच कोटी रुपये रोख रक्कम सापडली. सोंटू जैनचे दुबईत क्रिकेट बेटिंगचे जाळे असून त्याने सट्टेबाजीसाठी नागपुरात अनेकांना ‘आयडी’ दिली आहे. तसेच छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थानमध्येसुद्धा क्रिकेट बेटिंगचे जाळे तयार केले आहे. सोंटू हा हवाल्याच्या माध्यमातून नेहमी व्यापार करीत होता. त्यामुळे पोलिसांच्या रडारवर जैनची आणखी संपत्ती आहे.