चंद्रपूर : ओबीसींच्या रास्‍त मागण्यांसाठी चंद्रपुरात रवींद्र टोंगे गेल्‍या १४ दिवसांपासून अन्नत्‍याग आंदोलन करीत आहे. टोंगे यांची प्रकृती खालावली असतानासुद्धा मंत्रिमंडळातील एकही मंत्री आंदोलन सोडविण्यासाठी आले नाही. यामुळे राज्‍य सरकार हे ओबीसी विरोधी असल्‍याची टीका आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. दरम्यान रविवारी सकाळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरावर प्रेत यात्रा निघाली असताना पोलिसांनी जिल्हा न्यायालयासमोर आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी सर्व आंदोलकांना पोलीस मुख्यालय येथे ठेवण्यात आले आहे.

ओबीसींच्या रास्त मागण्यांसाठी चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे अन्नत्याग उपोषणाला बसले होते. टोंगे यांची प्रकृती खालावल्‍याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिथेही त्यांचे उपोषण सुरू आहे. त्‍यानंतर रविवारी आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या नेतृत्त्वात प्रेत यात्रा काढण्यात आली. उपोषण मंडपातून ही प्रेत यात्रा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार यांच्या घराकडे निघाली. ॲड. दत्ता हजारे, ॲड. पुरुषोत्तम सातपुते, नंदू नगरकर, राजू बनकर यांनी प्रेत यात्रेला खांदा दिला. तर सूर्यकांत खनके यांनी आकटे पकडले. यावेळी खनके यांनी मुंडण केले. त्याच वेळी जिल्हा न्यायालय समोर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी पोलिसांनी प्रेत यात्रा घेऊन जाणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

हेही वाचा – यवतमाळ : सोनोग्राफीत गर्भ सुस्थितीत, मात्र जन्म झाल्यानंतर…; डॉक्टरांना हलगर्जीपणा भोवला

आंदोलकांना पोलीस मुख्यालय येथे आणून बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुलांकरिता व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरू करण्यात यावी या मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली असल्‍याने त्‍यांच्या जिवास काही झाल्‍यास यास सर्वस्‍वी राज्‍य सरकार जबाबदार राहील. तेव्‍हा तत्‍काळ यासंदर्भात दखल घेण्यात यावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍याचे मुख्यमंत्री, दोन्‍ही उपमुख्यमंत्री, इतर मागास बहुजन कल्‍याण मंत्री यांच्‍याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा – गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला, नक्षल्यांनी पुरून ठेवलेली स्फोटके जप्त

दरम्यान विजय बलकी, प्रेमानंद जोगी हे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहे. आंदोलनात सूर्यकांत खनके, दिनेश चोखारे, बबनराव फंड, नंदू नागरकर, डॉ. अनिल शिंदे, निलेश बेलखेडे, कुणाल चहारे, भाऊराव झाडे, रोशन पचारे, महेश खंगार, संतोष देरकर, सुधाकर जोगी, गणपत हिंगाणे, राहूल चौधरी, भूषण फुसे, पांडूरंग टोंगे, सुनिता लोढीया, मनिषा बोबडे, कूसूम उदार, उज्‍वला नलगे, गोमती पाचभाई, मायाताई ठावरी, डॉ. राकेश गावतुरे, ॲड. प्रशांत सोनुने, सचिन निंबाळकर, गणेश आवारी, गणेश झाडे, योगेश बाेबडे, विनोद निब्रड, बाळा पिंपळशेंडे, महेश काहीलकर, अनिल धानोरकर, रवींद्र शिंदे, राजेश नायडू, पप्पू देशमुख, प्रफुल बैरम, हितेश लोडे, विकास विरुटकर, संदीप कष्टी, श्याम लेडे, अक्षय येरगुडे, अशोक उपरे, भाविक येरगुडे, राहुल भोयर, सुधाकर मत्ते, संजय धांडे, देवराव सोनपितरे, इम्रान शेख, परशुराम ठोंबरे, प्रलय मशाखेत्री आदींसह मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते.