बुलढाणा: हिंदुस्थान प्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांच्या अगोदरच वादग्रस्त ठरलेल्या खामगावच्या आजच्या सभेनिमित्त पुन्हा राडा झालाच. आक्रमक निषेध व्यक्त करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया पँथरच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सभास्थळ परिसरात अजूनही तणाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सभास्थळाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वंचित व पँथर च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खामगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. बायपास परिसरातील चोपडे भवन (मळा) येथे आज सोमवारी संध्याकाळी ५ वाजता भिडेंची सभा लावण्यात आली. मात्र, त्या अगोदरच ही सभा सुरू करण्यात आली.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/07/protest-vid.mp4

हेही वाचा… नागपूर : प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला गर्भवती करून तिच्याच मैत्रिणीशी जुळवले सूत…

संभाजी भिडे हे गुप्तपणे सभास्थळी दाखल झाले. यावेळी काळे झेंडे दाखवून व निषेधाच्या घोषणा करणाऱ्या वंचित व पँथर च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. माळी समाज बांधवांनी देखील निषेध व्यक्त केला. सभा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police detained the activists of vanchit and panthers who staged an aggressive protest and tried to reach the venue of sambhaji bhides meeting scm 61 dvr
Show comments