नागपूर : दोन मुलींची आई असलेली महिला एका युवकाच्या प्रेमात पडली. दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि मोबाईलने अश्लिल व्हिडिओ काढले. मात्र, प्रियकराची वाईट नजर तिच्या १८ वर्षीय मुलीवर पडली. त्याने मुलीला तिच्या आईचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याशीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोघेही मायलेकींनी जरीपटका पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी आई व मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला गृहिणी असून ती पती व दोन मुलींसह जरीपटक्यात राहते. महिला गृहिणी असून पती एका कंपनीत काम करतो. त्याला दारुचे व्यसन असून तो नेहमी दारुच्या नशेत राहतो. गेल्या दहा वर्षांपूर्वी महिलेची वस्तीत राहणारा युवक आशिष याच्यासोबत ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले आणि चॅटिंग करायला लागले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यावेळी त्या महिलेच्या दोन्ही मुली १० व १२ वर्षांच्या होत्या.

महिलेचा पती नेहमी बाहेरगावी कामाला जात असल्यामुळे आशिष हा बिनधास्तपणे महिलेच्या घरी यायचा. तसेच मोठ्या मुलीला आई आणि आशिष यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती होती. तो महिलेचे गेल्या दहा वर्षांपासून लैंगिक शोषण करीत होता. त्यासाठी महिलेची संमतीसुद्धा होती. यादरम्यान, महिलेच्या दोन्ही मुली मोठ्या होऊ लागल्या. दोनपैकी मोठ्या मुलीवर आशिषची वाईट नजर होती. मात्र, त्याबाबत महिलेला कल्पना नव्हती. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यापूर्वी आशिषने प्रेयसीचे अनेक अश्लील व्हिडिओ आणि फोटो मोबाईलमध्ये काढले होते.

आईसह मुलीला केले ब्लॅकमेल

आशिषने प्रेयसी घरी नसली की तिच्या मोठ्या मुलीशी गोडगोड बोलत होता. तिला महागडे गिफ्ट आणि ड्रेस घेऊन देत होता. त्याने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या आईसोबतचे शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ दाखवले. ते व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी दिली. व्हिडिओ डिलीट करण्याऐवजी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. आईची बदनामी होऊ नये म्हणून मुलगी तयार झाली. आरोपीने मुलीशीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि मोबाईलने तिचेही फोटो आणि व्हिडिओ काढले. हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरु होता.

लहान मुलीमुळे आला प्रकार उघडकीस

आशिषने महिलेसह तिच्या १८ वर्षीय मुलीचेही लैंगिक शोषण करणे सुरू केले. मोबाईलने दोघींसोबतही ठेवलेल्या शारीरिक संबंधाची चित्रफीतही काढली. ही चित्रफीत इंस्टाग्रामवर पोस्ट केली. त्या चित्रफिती महिलेच्या दुसऱ्या मुलीने बघितल्या. तिने आई व बहिणीला याबाबत विचारणा केली. समाजमाध्यमांवर चित्रफीत ‘व्हायरल’ झाल्याने महिलेने जरीपटका पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालकाचा शोध सुरू केला आहे.

Story img Loader