गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सक्रिय झालेल्या नक्षल्यांचा घातपात घडवून आणण्याचा डाव उधळून लावत गडचिरोली पोलिसांनी त्यांचा तळ उध्वस्त केला आहे. एटापल्ली व धानोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगतच्या टेकडीवर नक्षल्यांनी तळ बनवला होता. पोलीस कारवाईची कुणकुण लागताच नक्षलवाद्यांनी पळ काढला. यावेळी परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व साहित्य जप्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत घातपात घडविण्याच्या उद्देश्याने एटापल्ली आणि भामरागड तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड सीमाभागात जवळपास दहा ते बारा जहाल नक्षलवादी सक्रिय झाले आहे. काही दिवसांपूर्वी रेपनपल्ली हद्दीत झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. गुरुवारीदेखील छत्तीसगड सीमेवर मध्यरात्री सहा तास चकमक झाली. यानंतर २९ मार्चला पहाटे अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम दामरंचा येथे अशोक तलांडी या आदिवासी तरुणाचा ताडगावजवळ गळा आवळून हत्या करत नक्षल्यांनी पत्रक टाकले होते.

हेही वाचा…“गाव तिथे बियर बार, आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की अन् बिअर”, कोणत्या उमेदवाराने दिले हे आश्वासन; वाचा…

दरम्यान, पेंढरीपासून १२ किलोमीटरवर पूर्वेला छत्तीसगडच्या मानपूर जिल्ह्यातील चुटीनटोला गावाजवळ ४५० मीटर उंच पहाडीवर नक्षलवादी तळ ठोकून असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी ३० मार्च रोजी नक्षलविरोधी अभियान गतिमान केले. अपर अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी- ६० जवानांनी अतिशय खडतरपणे ही अवघड पहाडी पार करून नक्षल्यांचा तळ उध्वस्त केला. पोलिसांचा आक्रमक पवित्रा बघून नक्षल्यांनी पळ काढला. कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर, जिलेटिन स्टिक्स, बॅटरी, वॉकी टॉकी चार्जर, बॅकपॅक असे साहित्य जप्त केले आहे.

हेही वाचा…काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा, मात्र अकोला लोकसभेसाठी काँग्रेसला पाठिंबा मागितलेला नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

छत्तीसगड सीमेवरून नक्षल्यांटा गडचिरोलीत प्रवेश होऊ नये, यासाठी पोलीस सतर्क आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत सी- ६० जवानांनी तळ उध्वस्त करून त्यांचा डाव हाणून पाडला. या भागात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान केले आहे. – नीलोत्पल, पोलीस अधीक्षक

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police foil naxal plot in gadchiroli near chattisgarh border seized arms and materials ssp 89 psg