लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: मध्यरात्रीच्या साडेबारा वाजता फुटाळा तलावावर भयान शांतता. किर्र अंधारात एक महिला तलावाच्या दिशेने धावत येत होती. त्याच रस्त्यावरून अंबाझरीचे पोलीस निरीक्षक रितेश अहेर हे वाहनाने गस्त घालत होते. त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यांनी लगेच चालकाला वाहन थांबविण्यास सांगितले. तेवढ्यात त्या महिलेने तलावात उडी घेतली. निरीक्षक अहेर यांनी धावतच रस्त्यावरच्या झोपडीचे लाकूड आणि दोर तोडला. लगेच त्या महिलेच्या दिशेने पाण्यात फेकला. महिलेला विनंती केल्यानंतर तिने लाकूड पकडले. त्या महिलेला पाण्याबाहेर काढून महिलेचे प्राण वाचवले. देवाच्या रुपात धावून आलेल्या पोलीस निरीक्षकाचे सर्वस्तरावर कौतूक होत आहे.

वायूसेनानगरातील व्हेटरनरी महाविद्यालयाजवळील शासकीय सदनिकेत ३५ वर्षीय मनिषा (बदललेले नाव) राहते. ती उच्चशिक्षित असून पती शासकीय सेवेत आहेत. पतीला दारुचे व्यसन आहे. तिला दोन मुली असून मोठी मुलगी १५ तर लहान मुलगी १० वर्षाची आहे. पतीच्या दारुच्या व्यसनाली ती कंटाळली होती. दारु पिण्यावरून पतीशी नेहमी वाद होत होते. तर दुसरीकडे दोन्ही मुली तिच्या साध्या राहणीमानावरून वाद घालत होत्या. शासकीय अधिकाऱ्याची पत्नी असून ‘मॉर्डन’ राहत नसल्याची मुलींची ओरड होती. ‘मम्मी तू अपटूडेट का बर राहत नाही. तू खेडगावातील महिलेसारखी का राहतेस. तू टापटीप कपडे का घालत नाहीस’ असे वारंवार सांगून वाद घालत होत्या. त्यामुळे मनिषाला पतीचे व्यसन आणि मुलींचे राहणीमानावरून टोमणे सहन होत नव्हते. त्यामुळे तिने जीवनाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतला.

आणखी वाचा-चंद्रपूर: शंभर वर्षात प्रथमच जुलै महिन्यात २४२ मिमी पाऊस

आईला पाठवला निरोप

मनिषाने आत्महत्या करण्याचा निर्णय पक्का केला आणि गावी राहणाऱ्या आई-वडिलांना फोन करून भेटीला बोलावून घेतले. सोमवारी सकाळी १० वाजता ते पोहचणार होते. रविवारी मध्यरात्रीच मनिषाने फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचे ठरविले. म्हणजेच मनिषाने आईवडिलांना स्वतःच्या अंत्यसंस्कारालाच बोलावल्याची कबुली दिली.

आणखी वाचा-वर्धा : शाब्बास! वन्यजिवांच्या हिताचे कार्य, वनमंत्र्यांनी थोपटली आमदारांची पाठ

पोलिसांच्या धावपळीला यश

महिलेने उडी घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक रितेश अहेर, त्याचा चालक मंगल शेंडे आणि मनोज घोटेकर यांनी धावतच तलावाच्या काठावर गेले. दोरीला लाकूड बांधून पाण्यात सोडले. मनिषाने लाकडला पकडले. मात्र, ती आत्महत्या करण्याच्या विचारावर ठाम. निरीक्षक अहेर यांनी तिची समजूत घातली. तिला पाण्याबाहेर काढण्यात आले. तिच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. कुटुंबियांसह तिचे पोलिसांनी समूपदेशन केले. तिने चूक झाल्याचे कबूल करीत पती व दोन्ही मुलींसह तिला घरी सोडण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police inspector saved the womans life in nagpur adk 83 mrj
Show comments