नागपूर : पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी राजकीय दबाव झुगारल्याने तेथील पोलिसांची जमीन सुरक्षित राहिली. पण नागपुरात असे चित्र नाही. येथे राजकीय वजन वापरून पोलिसांच्या जमिनी बळकावणे सोपे असल्याचे दोन प्रकरणांवरून समोर आले आहे.

झिंगाबाई टाकळीतील पोलीस मुख्यालयाजवळील पोलिसांच्या जमिनीवर एका राजकीय नेत्याच्या शिक्षणसंस्थेअंतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेले अतिक्रमण नंतर राजकीय दबाव वापरून नियमित करण्यात आले. दुसऱ्या प्रकरणात मात्र बांधकाम व्यावसायिकावर गुन्हे दाखल करण्यात आले.

dcm ajit pawar warning pimpri chinchwad police over liquor sale prostitution in alandi
आळंदीतील मद्यविक्री, वेश्याव्यवसाय बंद न झाल्यास पोलिसांवर कारवाई; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
3 people suffered with severe eye damage due to lasers light in kolhapur
कोल्हापुरात लेझरमुळे तिघांच्या डोळ्यांना गंभीर इजा; नेत्रविकार तज्ज्ञांकडून बंदी घालण्याची माग
Maratha reservation, Buldhana district,
बुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
Woman Naxal Commander, Woman Naxal murder,
नक्षलवाद्यांकडून महिला नक्षल कमांडरची हत्या; पोलिसांशी संबंध असल्याच्या संशयातून…

हेही वाचा – वर्धा : विद्यार्थिनीवर बलात्कार, फरार आरोपींना पुण्यातून अटक

प्रत्येक शहरात पोलीस निवासस्थाने, प्रशिक्षण संस्था, कार्यालये व तत्सम बाबींसाठी जागा राखीव असतात. अधिकाऱ्यांना त्यांची माहिती नसल्याने या जागा दुर्लक्षित राहतात. अनेक वेळा त्यावर अतिक्रमण होते किंवा बनावट कागदपत्रांद्वारे मालकी हक्क दाखवला जातो. अशाच प्रकारचे एक उदाहरण नागपुरातील पोलीस आयुक्तालयाच्या मौजा झिंगाबाई टाकळीतील ४.४६ हेक्टर जमिनीचे (खसरा क्रमांक २९२ व २९३ मधील) आहे. ही जागा शासनाने २८ मे १९८५ ला पोलीस निवासस्थाने बांधण्यासाठी दिली होती. त्यापैकी २.३२ हेक्टर जमिनीवर एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याशी संबंधित शैक्षणिक संस्थेने अतिक्रमण केले. तेथे त्यांचे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. पोलिसांनी यावर आक्षेप घेतला. अतिक्रमण काढावे, अशी नोटीस तत्कालीन तहसीलदारांनी संस्थेला बजावली. संस्थेने या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. तेथेही न्यायालयाने पोलिसांची बाजू घेत शिक्षण संस्थेने केलेले अतिक्रमण काढण्याचे आदेश महसूल खात्याला दिले. मात्र, त्याची अंमलबजावणीच झाली नाही. त्यानंतर ३० मे २०१६ मध्ये संस्थेने पोलिसांना भेटून ही जागा देण्याची विनंती केली तर एप्रिल २०१७ मध्ये पोलिसांनी संस्थेला पत्र देऊन त्यांची जागा परत मागितली. अखेर शासनानेच शिक्षण संस्थेचे अतिक्रमण नियमित केले. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या मालकीच्या जागेवर पाणी सोडावे लागले. आता ही जमीन शिक्षण संस्थेच्या नावे असली तरी पूर्वी ती पोलिसांची होती, हे येथे उल्लेखनीय.

असेच एक प्रकरण सुराबर्डी येथील जमिनीचेही आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी राखीव ४.२६ हेक्टर जागा हडपण्याच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी व्यावसायिक अग्रवाल यांच्यासह सहाजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. प्रशिक्षण केंद्राचे (यूओटीसी) उपप्राचार्य दीपक पाटील यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली होती. अशाच प्रकारे शहरातील अनेक ठिकाणी पोलिसांच्या जागा आहेत. त्या सुरक्षित असल्याचा दावा विभागाने केला आहे. मात्र यापैकी काही जमिनीवर भूमाफियांचा आजही डोळा आहे.

हेही वाचा – ‘जागतिक दर्जा’ची मेट्रो जेव्हा अचानक रुळावरच बंद पडते अन्..

नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या मालकीच्या जमिनीवर कुठलेही अतिक्रमण नाही. त्याचा वापर पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपयोगासाठी, विभागाच्या उपक्रमासाठी होत आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त. नागपूर.