लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंदिया: ‘ऑनलाइन गेमिंग’ फसवणूक प्रकरणाचा तपास करणाऱ्या नागपूर गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पथक अनंत उर्फ ​​सौंटू जैन याच्यासह आरोपीच्या काका चौक, सिव्हिल लाइन्स गोंदिया येथील घरी गुरूवार २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता शारीरिक पडताळणीसाठी पोहोचले, येथे ५८ कोट्यवधी रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणासंदर्भात घराची झडती घेण्यात आली, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यादरम्यान काही भूखंड आणि भूखंडांच्या व्यवहाराशी संबंधित रक्कम आणि रजिस्ट्री ची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

गुरुवारी रात्री साडेआठ वाजता गुन्हे शाखेचे पोलिस पथक सौंटू जैन यांच्या दुकानातील नोकरांसह गोरेलाल चौक ते श्री टॉकीज चौक या मुख्य रस्त्यावर असलेल्या ‘कुर्ता वाला’ नावाच्या दुकानात पोहोचले, जेथे दुकान बंद होते. सेवकांचे हातानी शटर उघडून रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कसून झडती घेण्यात आली. सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आंतरराष्ट्रीय बुकी अनंत उर्फ ​​सौंटू जैन याने नागपूरच्या कनिष्ठ न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. सखोल चौकशीनंतर काही नावे समोर आली ज्याच्या आधारे सौंटू जैनचा मित्र डॉ. गौरव बग्गा डॉ. गरिमा बग्गा याला नागपूर पोलिसांनी या दाम्पत्याच्या घरावर छापा टाकला तेथून मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने जप्त करण्यात आले.

आणखी वाचा-भाजपने आरक्षणाच्या प्रश्नाला हात न लावता राज्य व देश लूटला; नाना पटोले आक्रमक

सौंटू जैन यांच्या लॉकरमधून रोख रक्कम आणि सोने अक्सिस बँकेतील अन्य तीन लॉकरमध्ये नेल्याप्रकरणी बँक व्यवस्थापक अंकेश खंडेलवाल यालाही पोलिसांनी अटक केली होती . सौंटू जैन याला पळून जाण्यास कोणी मदत केली, याचाही सविस्तर तपास करण्यात आला असून, याप्रकरणी आरोपींची सतत चौकशी सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुने बस स्टँड रोडवरील पेट्रोल पंपाच्या मागे असलेले लॅविश हॉटेल चे द्वार पोलिसांनी ठोठावले. तसेच हॉटेलचा शोध घेतला जात असल्याची माहितीही समोर येत आहे. या चौकशी मुळे आता गोंदियातील काही व्हाईट कॉलर चेहऱ्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, या छाप्यात कोणत्या वस्तू जप्त केल्या आहेत, याचा सविस्तर खुलासा नागपूर पोलिसांचे उच्चपदस्थ अधिकारी लवकरच नागपुरात करणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police raid in infamous sontu jains house shop hotel in gondia sar 75 mrj