नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळपेठमध्ये सुरू असलेल्या विला ५५ कॅफे हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा घातला. हुक्का पार्लरच्या मालक व व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई मंगळवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.

अंबाझरी, सदर, बजाजनगर आणि सीताबर्डीत हुक्का पार्लर बिनधास्त सुरू असून युवा पिढी पहाटेपर्यंत हुक्का पित असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी छापा घातला.

हेही वाचा – धक्कादायक! सिगारेटचे चटके देऊन प्रेयसीच्या मुलाचा अनन्वित छळ; विकृत प्रियकराला पोलीस कोठडी

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोकुळपेठमध्ये विला ५५ कॅफे हुक्का पार्लरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून युवक व युवतींना हुक्का, दारू आणि गांजा पुरवला जात होता. या ठिकाणी अंबाझरी ठाण्यातील काही कर्मचारी ‘अर्थपूर्ण’ भेटी देत होते. त्यामुळे विला ५५ येथे पोलिसांची कारवाई होत नव्हती. सोमवारी मध्यरात्रीपासून ते मंगळवारी पहाटेपर्यंत हुक्का पार्लर सुरू होते. अंबाझरी पोलिसांनी हुक्का पार्लरवर छापा घातला. या छाप्यात तंबाखू, हुक्का पॉट आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

हेही वाचा – जरांगे कुटुंबीय जालन्याहून बुलढाण्याकडे रवाना, मराठा आरक्षण क्रांती मोर्च्यात होणार सहभागी

मालक सोहेल सेठिया आणि व्यवस्थापक कार्तिक येवले यांच्यावर गुन्हा दाखल केला. तर तक्षक शांतवन मानावटकर (रा. अंबाझरी टेकडी, भीम चौक) आणि परेश मदन सोरते (कोष्टी मोहल्ला, इतवारी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई ठाणेदार विनायक गोल्हे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Story img Loader