लोकसत्ता टीम

नागपूर : पागलखाना चौकातील एका देहव्यापाराच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारून दोघांना अटक केली. अपर्णा नाईक (४०), फिरोज खान (५२) रा. गड्डीगोदाम अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यावेळी दलाल महिलेच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. ग्रामीण भागात राहणारी महिला २७ वर्षाची शहरात राहणारी ३२ वर्षांची आहे. दोन्ही महिलांकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेण्यात येत होता.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले

आरोपी महिला अपर्णा ही विवाहित असून ती पतीपासून वेगळी राहाते. काम न करता पैसे कमविण्यासाठी तिने कुंटणखाना चालविण्याचा व्यवसाय सुरू केला. गरीब, गरजू महिलांना आणि अल्पवयीन मुलींना झटपट पैसा कमविण्याचे आमिष दाखवून देहविक्रीसाठी भाग पाडते. याकामासाठी ती खोली आणि ग्राहक उपलब्ध करून देत होती. यापूर्वी सुध्दा तिच्या कुंटणखान्यावर पोलीस पथकाने धाड होती. वर्षभऱ्यापासून तिने पागलखान चौकातील चिटणविस नगर ले – आउट परिसरात किरायाने खोली घेतली. याठिकाणी ती गरीब, गरजू महिलांकडून देहव्यवसाय करून घेत होती. या कुंटणखान्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

आणखी वाचा-‘कँडल मार्च’द्वारे पूजाला श्रद्धांजली; अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल

पोलीस निरीक्षक कविता ईसारकर यांचे पथक घटनास्थळी दबा धरून होते. पंटर ग्राहकाला आरोपीच्या खोलिवर पाठविले. सौदा पक्का होताच पंटरने पथकाला ईशारा केला. पोलिस पथकाने धाड मारून आरोपी दलालांना पकडले. तर दोन पीडित महिलांची सुटका केली. आरोपींच्या ताब्यातून तीन मोबाईल, रोख व इतर साहित्य असा एकूण ४१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरूध्द सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला.

दोघींचे महिला दलाल-ग्राहकांकडून शोषण

कुटंनखान्याची दलाल ही एका ग्राहकाकडून ५ हजार रुपये घेत होती तर पीडित महिलांना फक्त ५०० रुपये देत होती. यातील एक पीडित महिला ग्रामीण भागात राहणारी असून ती विवाहित आहे. मागील काही महिण्यांपासून ती पतीपासून वेगळी राहाते. आईवर कर्जाचे डोंगर आहे. कर्ज फेडण्यासाठी ती सहज या व्यवसायाकडे वळली. दुसरी महिला शहरातील असून ती सुध्दा विवाहित आहे. आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची असल्याने ती सहज या व्यवसायात ओढल्या गेली. पीडित महिलांचे दलाल महिला आणि ग्राहकांकडूनही शोषण होत होते.

आणखी वाचा- महिला अधिकाऱ्यांच्या हाती राज्याची कमान; कोण आहेत या आयएफएस, आयएएस आणि आयपीएस अधिकारी?

अल्पवयीन मुलींनाही आमिष

अपर्णा नाईक ही दलाल गेल्या अनेक वर्षांपासून देहव्यापार करवून घेण्यात सक्रिय आहे. तिने विवाहित महिला, महाविद्यालयीन तरुणी आणि शाळकरी मुलीसुद्धा आंबटशौकीन ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. अपर्णाकडे सापडलेल्या डायरीत अनेक आंबटशौकीन ग्राहकांची नावे लिहिली असून पोलीस सर्वांवर कारवाई करणार आहेत. या कारवाईमुळे अनेक महिला दलालांमध्ये खळबळ उडाली आहे.