वर्धा : निवडणूक विविध प्रकारे गाजू लागली आहे. त्यामुळे मतदारांना विविध माध्यमातून प्रभावित करण्याचे प्रकार होतात. दारू, पैसे वाटप, पार्ट्या यास उधाण येते. आता सर्वत्र गाजत असलेल्या आर्वी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दारू साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

आर्वीलगत शिरपूर खडकी येथील अश्विन शेंडे यांच्या शेतात हा साठा दिसून आला. पोलिसांनी पहाटे दोन वाजता धाड टाकून हा साठा जप्त केला. या कारवाईवेळी खासदार अमर काळे पण उपस्थित झाले. त्यांनी आरोप केला की हा साठा आम्हीच पकडून दिला असून तो भाजपने मतदारांना प्रभावित करण्यासाठी आणला. शेतमालक हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर दारू सोबतच पैसाही दिसून आला असता. पण पोलिसांनी वेळेवर कारवाई केली नाही असा आमचा आरोप आहे. आता तरी उचित कारवाई करीत दोषींना शासन करावे असे खासदार काळे म्हणाले. तर भाजपने हा आरोप फेटाळून लावला आहे. भाजपचे उमेदवार सुमित वानखेडे म्हणाले की या निवडणुकीपूर्वी म्हणजे मी उभा नसतांनाही हे असे प्रकार झाले आहेत. मतदानाच्या तोंडावर असे करण्यात कोणाचा हातखंडा आहे, हे इथले ज्येष्ठ मतदार सांगतील. मला हे करण्याचे कारणच नाही. तरी पण पोलीस व निवडणूक प्रशासनाने काय योग्य ती कारवाई करावी, आमचे सहकार्य राहिलच. विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकत असल्याचे म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली.

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
thane police arrest
कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
drugs parli connection loksatta news
“गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जचे परळी कनेक्शन”, आमदार सुरेश धस यांचा धाराशिवमध्ये गौप्यस्फोट

हेही वाचा…राणांविरोधात बच्‍चू कडूंची ठाकरे गटाच्‍या बंडखोर उमेदवाराला साथ ; म्‍हणाले, “नेतेच आता खतरे मे…”

दारू साठा व आरोपी कोण, यांची चौकशी सूरू असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र ही घटना आर्वीची निवडणूक किती वेगळ्या वाळणावर जात आहे, हे स्पष्ट करते. आम्ही धमाका करू, असे सरसकट भाषणातून बोलल्या जात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस निवडणूक कार्यालयासाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत. आघाडीच्या मयुरा अमर काळे विरुद्ध युतीचे सुमित वानखेडे अशी इथली लढत होत आहे.

हेही वाचा…निवडणुकीच्या रणधुमाळीत “कुटूंब रंगल प्रचारात”

आर्वी मतदारसंघ या निवडणुकीत विविध कारणांनी राज्यात गाजत आहे. खासदार काळे यांनी पत्नीसाठी आणलेली उमेदवारी, त्यांच्यावर सर्व ईच्छुक उमेदवारांनी टाकलेला बहिष्कार, दादाराव केचे यांचे बंड, त्यासाठी झालेली धावपळ, आता सापडलेला दारू साठा असे धमाके होत आहे. पुढे अधिक काय होणार, अशी चर्चा मतदारसंघात होत आहे.

Story img Loader