यवतमाळ – अश्लील चित्रफीत दाखवून एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. ही बाब शहरातील मुलींच्या एका शाळेत बाललैंगिक शिक्षणासंदर्भात चाईल्ड लाईनतर्फे घेण्यात आलेल्या जनजागृती कार्यशाळेत उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुशाल चावरे (३७) रा. वाघापूर टेकडी,यवतमाळ याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

हेही वाचा >>> अनैतिक संबंधातून गर्भवती झालेल्या विधवेचे बाळ विकले; डॉक्टर, नर्ससह पाच जणांवर गुन्हा दाखल

येथील मुलींच्या एका शाळेत १० फेब्रुवारीला लैंगिक शिक्षणाबद्दल कार्यशाळा घेण्यात आली. समुपदेशकांनी विद्यार्थिनींना त्यांच्यावर कोणी काही अत्याचार करत असतील, त्रास देत असतील तर  तक्रार लिहून किंवा शिक्षकांना सांगण्याचे आवाहन केले. तेव्हा अवघ्या ११ वर्षाच्या, पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्यावरील आपबीती आपल्या शिक्षिकेकडे कथन केली. तिची कहाणी ऐकून शाळेतील शिक्षहकांसह समुपदेशकही हादरून गेले.

नात्यातील एक तरुण आई घरी नसताना येऊन मोबाईलमधील अश्लील चित्रफिती दाखवून लैंगिक अत्याचार करत असल्याचे या विद्यार्थिनीने सांगितले. आई घरी नसताना तो तरुण तीन, चार वेळा घरी आला. चाकूचा धाक दाखवून अश्लील चित्रफितीत दाखवितात तसा अत्याचार वारंवार केला, असे तिने सांगितले. हा सर्व धक्कादायक प्रकार १० जानेवारी ते १० फेब्रुवारीला दरम्यान घडला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चाईल्ड लाईन कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी ही बाब त्या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना सांगून समुपदेशन केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुशाल चावरे या नाराधमाविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक झाडे करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police registered case against relative for molesting minor girl nrp 78 zws