नागपूर : मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका तरुणीने अभियंता असलेल्या तरुणाशी मैत्री केली. वडिलाच्या प्रकृतीचे कारण सांगून मित्र, त्याचे कुटुंबिय आणि अन्य काही युवकांच्या नावावर परस्पर बँका व वित्त संस्थांकडून कर्ज उचलून कोट्यवधींची फसवणूक केली. संबंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिने नागपूरसह पुण्यातील अभियंत्यांनादेखील आपल्या जाळ्यात ओढून फसवणूक केली आहे.

सेजल अजय साधवानी (२५, एलआयजी कॉलनी, कुकरेजानगर) असे आरोपी तरुणीचे नाव आहे. तिच्याविरोधात प्रणय अरुण पंडित (२५, हुडकेश्वर) याने तक्रार केली आहे. तो पुण्यातील एका आयटी कंपनीत अभियंता आहे. तो मित्रांसोबत जेवायला बाहेर गेला असता एका मैत्रिणीसह  सेजल आली होती व तिथे तिची प्रणयशी ओळख झाली. तिने ती मुंबईत सीए असल्याची बतावणी केली व प्रणयसोबत भ्रमणध्वनीवरून बोलण्यास सुरुवात केली. तिने त्याच्याशी मैत्री वाढविली व वडिलांचा अपघात झाला असून त्यांना कर्करोग असल्याचे सांगितले. ‘पैशांची खूप जास्त गरज असून कर्जाची रक्कम प्रणयच्या खात्यावर येईल,’ असे सांगत तिने त्याला विश्वासात घेतले. २६ फेब्रुवारी ते ८ एप्रिल या कालावधीत प्रणयने तिला आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर दस्तावेज दिले. तिने त्याच्या नावावर २९.२५ लाखांचे कर्ज काढले. मात्र, याची कल्पना त्याला दिली नाही. ‘कर्ज मीच काढले असून केवळ ते तुझ्या खात्यात जमा होईल, तू ती रक्कम मला वळती’ कर असे सांगितले. याच प्रकारे तिने त्याचे वडील, पुण्यात नोकरी करणारी बहीण यांनादेखील गंडविले व त्यांच्या खात्यावर आलेले ५६.४६ लाख रुपये स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करवून घेतले. तिने काही दिवस हप्ते भरले व त्यानंतर पैसे देणे बंद केले. त्यानंतर बँका व वित्त संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रणयच्या घरी धडक दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. प्रणयच्या तक्रारीवरून आरोपी सेजलविरोधात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Five young women sold into prostitution with the lure of employment
नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात पाच तरुणींची विक्री, गुन्हे शाखेकडून तरुणींची सुटका
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…
Romita Majumdar
फेनाम स्टोरी: टेलिंग हर ‘फॉक्स’टेल
Adulterated food pune, Food and Drug Administration pune, Diwali, Adulterated food,
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा लाखोंचा बाजार! पुणे विभागात दसरा, दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

हेही वाचा >>> खुशखबर… विजेचे दर घटणार! राज्यात युनिटमागे एवढ्या रुपयांची…

अनेक मित्रांची केली फसवणूक

सेजलने अशा पद्धतीने अनेक अभियंत्यांची फसवणूक केली आहे. तिने प्रणयचे मित्र कार्तिक कुऱ्हेवार, हर्षल भिवगडे, ऋत्विक शिंदे, संघर्षे, तुषार, स्वाती आणि तिची स्वत:ची मैत्रिण राशी यांनादेखील त्याचप्रकारे विश्वासात घेऊन त्यांच्या नावानेदेखील ३२ लाखांचे कर्ज उचलले. ग्रामीणच्या एका आमदाराचा नातेवाईक अजिंक्य (उमरेड) यालाही २५ लाखाने सेजलने गंडा घातला.

हेही वाचा >>> ऊर्जामंत्री फडणवीसांच्या नागपुरात वीज यंत्रणा टाकणार कात!; ३१३ कोटींच्या निधीतून…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक

सेजलचा शेअर मार्केटमध्ये चांगला अभ्यास असून तिने दोन कोटींच्या वर रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली आहे. तिने काही नातेवाईकांच्या नावावर भूखंड घेतले आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या दोन कोटी रुपयातून ती रोज १ ते ३ लाख रुपये कमावत आहे. ती सध्या भारतातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.