भंडारा : तुमसर येथील इंदिरा नगरातील राजकमल लाँड्रीमधून पोलिसांनी सुमारे ६ ते ७ कोटी रुपयांचा ऐवज जप्त केल्याच्या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माहिती मिळताच भंडारा येथील एलसीबी पोलिसांनी या लॉन्ड्रीवर छापा टाकून रक्कम जप्त केली असून, याप्रकरणी एका नामांकित बँकेचे व्यवस्थापक जगदीश काटकर यांच्यासह सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. एवढी मोठी रक्कम कुणाची याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.

हवाला हा एक बेकायदेशीर व्यवसाय असून हवाला रॅकेट चालवणारे दलाल हवालाद्वारे संबंधित व्यक्तीला पैसे पाठवतात. यासाठी एक विशिष्ठ कोड शब्द वापरून संबंधित व्यक्ती त्याच्या शहरातील एजंटशी संपर्क साधते आणि त्याला कोड सांगते, त्यानंतर तो एजंट त्या व्यक्तीला पैसे देतो, अशा प्रकारे हवालाद्वारे पैशाची बेकादेशिरपणे देवाणघेवाण होत असते.

याआधीही पोलिसांनी अनेकवेळा हवाला व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये बँक व्यवस्थापकही हवाला व्यवसायात सहभागी आहेत, बँक व्यवस्थापक हवाला व्यापाऱ्यांना मदत करतात आणि त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करतात. त्यामुळेच पोलिसांनी हवाला व्यवसायात सहभागी असलेल्या बँक व्यवस्थापकालाही अटक केली आहे. वरील कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे एसएचओ नितीन चिंचोलकर यांनी केली आहे.