गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा होत असल्याची माहिती कळताच दामिनी पथक, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा बाल सरंक्षण कक्ष आणि गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी दाखल होत १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे होत असलेले लग्न थांबवले.

हेही वाचा >>> सूरजागड लोह खाणीतील वाढीव उत्खननाला अनेक अटींसह पर्यावरण विभागाची परवानगी

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ladki Bahin Yojana Pune, Pune District women Ladki Bahin, Ladki Bahin Yojana benefit,
Ladki Bahin Yojana Pune : पुणे जिल्ह्यात ५० हजार ‘बहिणी’ ‘लाडक्या’ होण्याच्या प्रतीक्षेत!
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
Scrutiny of all applications of beneficiaries of the Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana  Mumbai news
लाखो बहिणी नावडत्या; ‘लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व अर्जांची छाननी,वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आदिती तटकरेंची घोषणा
woman dies in stampede during pushpa 2 movie
‘पुष्पा-२’ चित्रपटादरम्यान चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू

दामिनी पथकाला जिल्ह्यातील एका गावामध्ये १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह गुरूवार ०२ मार्च २०२३ रोजी सायं. आयोजीत करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दामिनी पथक , पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामिण , महिला व बाल विकास विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी संयुक्तपणे सदर ठिकाण गाठले असता विवाहाची पूर्वतयारी सुरु असल्याचे दिसून आले. लग्न मंडप उभारण्यात आला होता. वराती करिता जेवण तयार करणे सुरू होते. पथकाने मुलीची योग्य ती चौकशी केली असता ती मुलगी १६ वर्ष ०२ महिन्यांची असल्याचे निदर्शनास आल्याने मुलीचे व मुलाचे पालकांना समुपदेशन करून हा नियोजीत विवाह रद्द करण्यात आला.

हेही वाचा >>> मेट्रोप्रमाणे रेल्वेही उन्नत मार्गाचा पर्याय शोधतेय! इतवारी-नागभीड, वडसा-गडचिरोली उन्नत रेल्वेमार्ग

मुलीला महिला बालकल्याण समिती समोर हजर करुन मुलीसह तिच्या आईला समुपदेशन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे , अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली दामिनी पथकचे मपोउपनि प्रियंका पवार , पोशि राजेंद्र अंबादे , रमेंद्र बावनकर मपोशि निशा बंसोड , पुनम मंजुटे , नेहा पाचे पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामिणचे सपोनि आसाराम चव्हान,सहा पोउपनि प्रदिप गणवीर,पोशि दिपक लिल्हारे,राकेश इंदुरकर आणि महिला व बाल विकास विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे गजानन गोबाडे,रेखा बघेले,मनिषा मोहुले,कपील टेंभुरकर, भागवत सुर्यवंशी यांनी संयुक्तपणे केली.

Story img Loader