नागपूर : नागपूरच्या कुठल्याही भागात जा, तेथे एका सार्वजनिक ठिकाणी १००-२०० महिला गोळा झालेल्या दिसतील. साधारणपणे कष्टकरी, कामकरी, मंजूर या वर्गातील या महिला असतात. प्रत्येकीच्या हाती रेशन कार्ड असते. कोणी तरी येण्याची त्या वाट बघत असतात. ज्या ठिकाणी या महिला गोळा झालेल्या असतात तेथे सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचे भव्य कट आऊट लागलेले असते. त्यावर. ‘ ..भाऊंच्या कृपेने’ असे लिहिले असते. त्यांचे कार्यकर्ते अधूनमधून फेरफटका मारून जातात, गर्दी किती झालीं ते बघतात. थोड्यावेळात एक व्यक्ती येतो.त्याच्या हाती एक मोठी यादी असते. तो त्यातील एक – एक नाव वाचायला सुरुवात करतो आणि उपस्थित असणाऱ्या महिलांचा पाच – जणींचा गट तयार केला जातो. त्याना शेजारी आडोशाला असेल्या भल्या मोठ्या ट्रूक वजा कंटेनरकडे पाठवले जाते. तेथे प्रत्येकीची चिठ्ठी पाहून भला मोठा बॉक्स दिला जातो. तो उघडल्यावर त्यातून एक स्टिलच्या पत्र्याची एक मोठ्ठी पेटी निघते.. सध्या या अशा पेट्या घेण्यासाठी शहरात विविध भागात महिलांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे त्याची खुप चर्चा आहे. कशाच्या आहेत या पेट्या? याच्याशी भाजपचा संबंध काय? मध्यमवर्गीयांनाही त्याचे वाटप का केले जाते, असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहे.

कशाच्या आहेत या पेट्या ?

केंद्र व राज्य शासनातर्फे गरीब आणि कामगार यांच्यसाठी विविध योजना राबवल्या जातात. यापैकीच एक इमारत बांधकाम कामगारांसाठी एक योजना आहे. त्याना कार्यस्थळी लागणा-या वस्तू तसेच भांडे वाटप केले जाते. त्यात जीवनावश्यक भांडी,कुकर, पिंप, ताट, वाट्या, ग्लास, टॉर्च आणि अन्य तत्सम वस्तूंचा समावेश असतो. ही किट् फक्त कामगारांसाठीच असते. ती कामगार म्हणून नोंदणी करणा-या कामगारांना निःशुल्क वाटप दिली जाते.

हे ही वाचा…Maharashtra Elections 2024 : बुलढाण्यात महाविकास आघाडीत पेच

योजनेची चर्चा का ?

अनेक वर्षांपासून ही योजना सुरू आहे. त्याची चर्चा भाजपची केंद व राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून या साहित्याचे वाटप सत्ताधारी पक्ष निवडणूक जवळ आल्यावर केले जाते. किट्स वाटप फक्त कामगारांसाठी असताना यावेळी गैर कामगार, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय गटांतील कुटूंबातील महिलांनाही वाटप केल्या जात आहे. त्यामुळे त्या घेण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी वाढली आहे. अनेक जण कारमधून येतात आणि त्यांचे नाव यादीत असल्याने त्यांना पेटी वाटप केले जात आहे. दक्षिण नागपूरमध्ये आमदार मोहन मते यांच्या पुढाकारातून पेट्या वाटप करण्यात आले. दक्षिण पश्चिम नागपूर या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघात चिंचभवन मध्ये कामगारांची संख्या कमी असताना रोज हजारो महिलांना पेट्या वाटप केले जात आहे.

भाजपवर आरोप का?

केंद व राज्य सरकारची ही योजना कामगारांसाठी असताना त्याची अंमलबजावणी भाजपकडून केली जात आहे. भाजप नेत्यांची मोठ्या प्रमाणात त्यांच्या मतदारांचा समावेश कामगार म्हणून यादीत केला आहे,अनेक श्रीमंत महिलांना चिंचभवनमध्ये पेट्या वाटप करण्यात आले असा नागरिकांचा आहे.

हे ही वाचा…Maharashtra Elections 2024 : चंद्रपूरमध्ये महिलांना संधी मिळणार का?

निवडणुकीचा संबंध आहे का?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. नागपूरसह राज्यात भाजपसह महायुतीची स्थिती चांगली नाही, त्यामुळे सरकारी पैशाने कामगारांच्या नावे खरेदी केलेल्या पेट्या भाजप त्यांच्या मतदारांना वाटप करीत आहे. असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.