नागपूर: राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या पाचही राज्यात निवडणुका होत आहेत. तिकडे सर्वच राजकीय पक्षाच्या सभा, रोड शो होत आहेत. पण, नागपुरात सध्या निवडणूक नाही तरीही राजकीय नेते आज मोठ्या संख्येने येत आहेत.
आज नागपूर विमानतळावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आगमन झाले. काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष येणार म्हटल्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री अनीस अहमद विमानतळावर उपस्थित होते. तसेच शिबू सोरनेही आज नागपुरात दाखल झाले.
हेही वाचा… ‘पार्टटाईम जॉब’च्या नादात ३ लाख गमावले
हे सर्व नेतेमंडळी नागपुरात एका लग्नसोहळ्याला आली आहेत. काँग्रेसचे नेते अविनाश पांडे यांचे सुपूत्र गौरांग यांचा विवाह सोहळा आहे. त्यासाठी राजकीय नेते मंडळी आज नागपुरात आहेत.