वर्धा : शेतकऱ्यांच्या समस्या सुटता सुटत नाही म्हणून विविध राजकीय पक्ष तसेच शेतकरी संघटना नेहमी आवाज उठवीत असतात. पण हा विखुरलेला स्वर जर एकत्र आला तर आवाज गुंजनारच. हेच ध्येय ठेवून भाजपा सोडून सर्व प्रमुख पक्ष तसेच बीआरएस, आम आदमी पक्ष, माकप हेपण आंदोलनात उतरणार. शिवाय विविध शेतकरी संघटना तसेच शहरातील बहुतांश स्वयंसेवी संघटना या आंदोलनात उतरत आहेत.
हेही वाचा – गोंदिया : चिचगावटोल्यातील निर्माणाधीन जलकुंभ जमीनदोस्त, कारण काय? जाणून घ्या..
हेही वाचा – बुलढाणा : …अन् म्हणे गतिमान सरकार! जुलै महिन्यातील अतिवृष्टीची मदत ऑक्टोबरमध्ये!
५ ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता हे सर्व बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान मार्च काढणार आहे. पिकांची नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळावी, वर्तमान पीक विमा योजना रद्द करीत शेतकरी सानुग्रह योजना लागू करावी, कंत्राटी पद्धत बंद करावी व अन्य मागण्या आहेत. हा आक्रोश मोर्चा यशस्वी होणार. समाजातील सर्व पिचलेले घटक सरकारला जाब विचारणार असल्याचे एक संयोजक अविनाश काकडे म्हणाले.