चंद्रपूर : मागील दीड महिन्यांपासून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे संचातून सातत्याने सुरू असलेले प्रदूषण बघता प्रदूषण नियंत्रण मंडळाने १५ लाखांची बँक गॅरंटी जप्त करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच याचप्रकारे प्रदूषण सुरू राहिले तर संच बंद करण्याबाबतची नोटीस दिली आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनीही वीस दिवसांपूर्वी वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कडक इशारा दिला होता.
येथील वीज केंद्राच्या संच क्रमांक ९ व ३ मधून जीवघेणे प्रदूषण सुरू आहे. सप्टेंबर महिन्यापासून तर चंद्रपूर लगतचे नवे ८ आणि ९ हे संचातून दररोज हजारो टन राख शहरावर फेकल्या जात आहे. वीज केंद्र व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रार करूनही कोणतीही कारवाही केली जात नाही अशा नागरिकांच्या तक्रारी आहे. जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या आहे. मात्र, यावर काहीही एक कारवाई केली गेली नाही. चंद्रपूरची हवा गुणवत्ता निर्देशांक खराब आहे.
हेही वाचा…‘एमपीएससी’तर्फे संभाव्य वेळापत्रक जाहीर, राज्यसेवा २०२५ च्या परीक्षेत काय बदल वाचा…
ह
गेल्या महिन्यापासूनच्या वीज केंद्राच्या राखेमुळे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक खराब झाला आहे. सप्टेंबरच्या २३ तारखेपासून वाईट श्रेणीत असून निर्देशांक २०० ते २१३ पर्यंत होता. नोव्हेंबर महिन्याच्या १ ते १२ तारखेपर्यंत सुद्धा निर्देशांक खराब श्रेणीत १४१ ते २०० पर्यंत गेला आहे. त्यामुळे असेच प्रदूषण सुरू राहिले तर पुन्हा चंद्रपूर शहरवासीयांकडून आंदोलन करण्यात येईल, असा लेखी इशारा विविध संघटनांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देताच प्रदूषण मंडळाने वीज केंद्राला १५ लाखांची बँक गॅरंटी जप्तीची नोटीस बजावली आहे. तसेच प्रदूषण करणारे संच बंद करण्याची कारवाई केली जाईल, असेही या नोटीसमधून म्हटले आहे. विशेष म्हणजे, जीवघेणे प्रदूषण सुरू असतानाही वीज केंद्राचे अधिकारी यावर उपाययोजना करायला तयार नाही.गेल्या महिन्यापासूनच्या वीज केंद्राच्या राखेमुळे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक खराब झाला आहे. सप्टेंबरच्या २३ तारखेपासून वाईट श्रेणीत असून निर्देशांक २०० ते २१३ पर्यंत होता. नोव्हेंबर महिन्याच्या १ ते १२ तारखेपर्यंत सुद्धा निर्देशांक खराब श्रेणीत १४१ ते २०० पर्यंत गेला आहे. त्यामुळे असेच प्रदूषण सुरू राहिले तर पुन्हा चंद्रपूर शहरवासीयांकडून आंदोलन करण्यात येईल, असा लेखी इशारा विविध संघटनांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देताच प्रदूषण मंडळाने वीज केंद्राला १५ लाखांची बँक गॅरंटी जप्तीची नोटीस बजावली आहे. तसेच प्रदूषण करणारे संच बंद करण्याची कारवाई केली जाईल, असेही या नोटीसमधून म्हटले आहे. विशेष म्हणजे, जीवघेणे प्रदूषण सुरू असतानाही वीज केंद्राचे अधिकारी यावर उपाययोजना करायला तयार नाही.
हेही वाचा…राज्यभरात मतटक्का वाढला… पण, ६२ मतदारसंघात तृतीयपंथींनी….
काही दिवसांपूर्वी आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेनेही जिल्हाधिकारी विनय गौडा यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतरही प्रदूषण सुरूच आहे. जिल्हाधिकारी गौडा यांनी वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चांगलेच ठणकावले होते. मात्र, तरीही प्रदूषण सुरूच असल्याने आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने बँक गॅरंटीची नोटीस बजावली आहे. यानंतरही वीज केंद्र सुधारले नाही तर थेट संच बंदचा इशारा दिला आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तानाजी यादव यांना विचारले असता नोटीस बजावली आहे अशी माहिती दिली.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वीज केंद्राच्या संच क्रमांक ८ व ९ मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे. त्यामुळेच वीज केंद्राच्या संचातून अक्षरश: राख बाहेर पडत आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर चंद्रपूरकरांचे आरोग्य धोक्यात आहे.