जमिनीत बिळ करून राहणारा लाजराबुजरा साळींदर हा वन्यजीव थेट शहरातील रस्त्यावर उतरल्याने सर्वत्र उत्सुकता पसरली. वन्यजीव अधिवासात मानवी अतिक्रमण वाढल्याचा हा परिणाम असल्याचे वन्यजीवप्रेमी आशीष गोस्वामी म्हणाले.
हेही वाचा – कौतुकास्पद ! आंतरराष्ट्रीय अलामा अब्याकस स्पर्धेत चंद्रपूरचा स्पंदन मानकर जगात दुसरा
हेही वाचा – सीबीआयने ‘वेकोलि’च्या अधिकाऱ्याला एक लाखाची लाच घेताना केली अटक
माकडांपाठोपाठ आता मसण्याउद, खवले मांजर, साळींदर हे जीव शहरात भटकायला लागल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. गेल्या दोन दिवसांत दोन साळींदर वाचवण्यात आले असून, त्यांना पुन्हा वन विभागाने बोरच्या रानात सोडले. साळींदर हा सस्तन प्राणी सायाळ, साळू या नावानेही ओळखल्या जातो. साधारण तीन फुटांचा हा जीव जंगलात, शेतात बिळ करून राहतो. बिळ गाभ्यात सर्व दिशेने बोगदे केले असतात. जमिनीवर चरत असताना काही धोका दिसल्यास कुटुंबप्रमुख सायाल सोडून पिल्ले बोगद्यातून आपल्या घरात शिरतात.