सुमारे महिनाभर खोकल्यातून कमी, अधिक रक्त जायचे. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तपासणीत रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. यावेळी निमोनियाची गुंतागुंत वाढली. त्यानंतरही येथील डॉक्टरांच्या उपचारावर विश्वास, दुसरीकडे मनात सातत्याने सकारात्मक विचार आणले. त्यातूनच या आजारातून तीन महिन्यांनी बाहेर पडलो, असे मत सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- प्राजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात पोलीस ‘अलर्ट मोड’वर, ३ हजार पोलीस बंदोबस्तात

गडचिरोलीतील हेमलकसा येथे लोक बिरादरी प्रकल्पात लोकसत्ताशी बोलताना डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, कर्करोगाचे निदान होण्याच्या बऱ्याच काळापूर्वीपासून मला ताप आणि इतरही त्रास होता. यावेळी ‘क्रोसिन’सह इतर औषधी घेऊन वेळ काढला. गोळी घेतल्यावर ताप कमी व्हायचा, परंतु कालांतराने पुन्हा त्रास वाढायचा. रक्त तपासणीत पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. त्यामुळे मला काहीतरी गंभीर आजार असल्याची जाणीव झाली. नागपुरातील डॉक्टरांकडेही उपचार घेतले. शेवटी पुणे येथील रुग्णालयात विविध तपासणीत कर्करोगाचे निदान झाले.

हेही वाचा- नागपूर : ‘झाडीपट्टीतील दादा कोंडके’ अशी ख्याती असलेले परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार

उपचारासाठी लांब काळ रुग्णालयात रहायचे होते. ‘किमोथेरपी’ सुरू झाली. त्यात ‘सलाईन’मधून औषध दिले जात होते. बराच काळ खोकल्यातून रक्त जात होते. यावेळी ‘निमोनिया’ची गुंतागुंत वाढल्यावर डॉक्टरांमध्येही चिंता वाढली. परंतु, मी माझ्यावर उपचार करणारे ‘हेमॅटोलॉजिस्ट’ डॉ. समीर मेलिन्केरी आणि डॉ भरत पुरंदरे यांच्यावर विश्वास ठेवला. दुसरीकडे सकारात्मक विचारांसाठी गेल्या पन्नास वर्षांत आपण काय केले? हे आठवत होतो. उपचारादरम्यान पत्नी डॉ. मंदाकिनी, दोन्ही मुले व सून सोबत होते. त्यांचा आधार असतानाच दुसरीकडे हेमलकसातील आदिवासी विद्यार्थी, कर्मचारी मला पत्र पाठवून लवकर बरे होऊन परत या, असे म्हणत होते. प्रकल्पातील जंगली प्राण्यांचीही खूप आठवण यायची.

हेही वाचा- वाशीम: माझ्या मारहाणीचा ‘व्हिडीओ व्हायरल‘ झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ, आमदार संतोष बांगर म्हणाले, महिलांवर…

शेवटी यशस्वी उपचाराने बरा झाल्यावर हेमलकसाला परतलो. आदिवासी विद्यार्थी, कर्मचारी, प्राण्यांनी स्वागत गेले. बरे झाल्यावरही सुरुवातीला खूपच कमजोरी होती. हळूहळू चालणे, फिरणे, सायकल चालवणे सुरू केले. आता पूर्वीप्रमाने चांगले वाटत आहे. सध्या माझ्या रक्तदाबासह इतर वृद्धापकाळाशी संबंधित औषधी सुरू आहे. पुणे येथे रुग्णालयात माझ्याकडून शुल्कापोटी पैसा घेण्यात आला नाही. परंतु, कुणाचाही असो माझ्या उपचारावर खर्च होत होता. या खर्चावरही माझा आक्षेप होता, असेही डॉ. आमटे यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या यशस्वी उपचारानेच बरा झालो

उपचारादरम्यान सातत्याने खोकल्यात रक्त जाण्यासह रक्ताच्या ओकारी होत होत्या. मध्येच ताप यायचा. सुरुवातीला डॉक्टरांना या तक्रारी सांगितल्या. पशुही कधी तक्रार करत नाही. शेवटी डॉक्टरांना माझ्यावर पशुप्रमाणे उपचार करा, आता मी कसलीही तक्रार करणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी एकदा माझ्या मनात एके दिवशी मला मरायचे आहे, आणि त्यामागे एक कारण आहे. मी गमतीने डॉक्टरांना सांगितले. की वृद्धापकाळात माणसाला इतर कोणताही आजार नसला तरीही न्यूमोनियाने मृत्यू होतो. परंतु, डॉक्टरांच्या यशस्वी उपचाराने बरा झाल्याचेही डॉ. आमटे म्हणाले.

हेही वाचा- चंद्रपूर: ताडोबात आता २५ हजारात अर्धा दिवस सफारी

ॲलोपॅथी उपचाराचा निर्णय घेतला

आजारी पडल्यावर आदिवासींमधील रुढ विविध पद्धतीने उपचारासह माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी विविध पद्धतीच्या उपचाराचा सल्ला दिला. परंतु, या पद्धतीने उपचाराचे कोणतेही वैज्ञानिक प्रमाण नव्हते. त्यामुळे पुणे येथे ॲलोपॅथी उपचाराचा निर्णय घेतल्याचेही डॉ. आमटे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Positive thinking has a positive effect on cancer treatment opinion of social worker dr prakash amte mnb 82 dpj