नागपूर : सध्या भाजपमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खच्चीकरण सुरू आहे. एखाद्या दिवशी गडकरींच्याच विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) वापर होऊ शकतो, अशी शंका काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी आज शनिवारी नागपुरात व्यक्त केली.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेत्यांनी तंत्रज्ञान यात्रेचे आयोजन केले होते. त्यात सहभागी होण्यासाठी कन्हैया कुमार नागपुरात आले असता ते विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्दय़ावर कन्हैया कुमार यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘युवा है जोश में लायेंगे इन्हे होश में’ या रॅलीच्या माध्यमातून देशाला विकणाऱ्यांच्या विरोधात लोकांना जागे करण्याचे काम केले जात आहे. 

आज देशासमोर बेरोजगारी, महागाईचे आव्हान आहे, शासकीय कंपन्या विकल्या जात आहेत. हे सर्व थांबवायचे आहे. त्यासाठी लोकांना एकत्रित करण्याकरिता ही तंत्रज्ञान यात्रा काढण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

Story img Loader