नागपूर – ऑफीस, बाजार किंवा अन्य कामांसाठी तुम्ही दुचाकी-चारचाकी वाहनांनी घराबाहेर पडत असाल तर कोणत्या रस्त्याने जावे किंवा कोणत्या रस्त्याने जाणे टाळावे हे लक्षात घ्या.
हुडकेश्वर, मानेवाडा, बेसा, बेलतरोडीवरून सीताबर्डीकडे जात असला तर अजनी रेल्वे पुलाच्या रस्त्याने जाणे टाळा. कारण अजनी पुलासमोरील चौकात मोठी वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे आपले वाहन वाहतूक कोंडीत अडकू शकते. जर लवकरात लवकर सीताबर्डीला पोहोचायचे असेल तर मेडिकल चौक, बैद्यनाथ चौक, मोक्षधामच्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याने जाऊ शकता. कारण रस्ता मोठा असल्यामुळे तेथे वाहनांची गर्दी राहणार नाही. तुम्ही निर्धास्तपणे या रस्त्याने लवकरात लवकर सीताबर्डीला पोहोचू शकता.
पोलीस आयुक्त आणि वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी शहरातील काही ठराविक रस्त्यावरील वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्त्यांवरील वाहतूक दुसऱ्या रस्त्याकडे वळती केली आहे तर काही रस्त्यांवर दुरुस्तीकरण सुरु आहे. इंदोरा, कामठी मार्ग, पाचपावली, जरीपटका आणि मानकापूरकडून सीताबर्डीकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी कळबी चौकातील पुलावरून जाणे टाळावे. कारण पुलावर सध्या वाहनांची मोठी गर्दी असल्याने कोंडी निर्माण झाली आहे.
हेही वाचा – मूकबधिर विद्यार्थ्यांना ‘हायटेक’ शिक्षण, राज्यातील पहिला प्रयोग अकोल्यात
सदरमध्ये मंगळवारी बाजार चौकातही वाहनांची मोठी गर्दी असल्याने वाहतूक कोंडी आहे. तसेच सायंकाळी महाल, ईतवारी चौककाकडून सीताबर्डीत पोहोचायचे असेल तर थेट मेयो रुग्णालयाजवळील पुलाच्या रस्त्याचा वापर करा. दिघोरी, सक्करदरा, उमरेड रोड, नंदनवन या परीसरातून सीताबर्डीकडे येणाऱ्या नागरिकांनी सक्करदरा पुलावरील रस्त्याचा वापर करावा. खालच्या रस्त्यावर नेहमीप्रमाणे आजही वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे पुलाचा रस्ता सोपा असून खालील रस्ता टाळावा. सायंकाळी इंदोरा, पाचपावली, महाल, मोक्षधाम मार्ग, माटे चौक, बुधवारी बाजार मार्ग आणि कृपलानी-रहाटे चौक या रस्त्याने वाहतूक कोंडी आहे. या कोंडीतून वाचण्यासाठी वाहनचालकांनी लहान रस्ता किंवा पर्यायी रस्त्याचा वापर करावा. जेणेकरून वाहतूक कोंडीतून वाचता येईल.