धुळे – विविध मागण्यांसाठी ग्रामीण टपालसेवकांनी मंगळवारपासून संप सुरु केला असून त्यामुळे बुधवारी ग्रामीण भागातील टपालसेवा विस्कळीत झाली. शहरातील मुख्य टपाल कार्यालयाजवळ निदर्शनेही करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष आर्वी देवरे, उपाध्यक्ष विनोद बागले, एम.डी. अहिरे, साहेबराव पाटील, हेमकांत जोशी, प्रकाश पाटील आदी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा – कांदा निर्यातबंदीतून नाशिकमध्ये ताकद वाढविण्यास शरद पवार यांना आयतीच संधी

Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

हेही वाचा – अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

याबाबत ग्रामीण डाकसेवक संघटनेने दिलेल्या निवेदनात भूमिका मांडली आहे. ग्रामीण टपालसेवक (डाकसेवक) कर्मचाऱ्यांना आठ तास काम, निवृत्ती वेतन, नियमित कर्मचाऱ्यांना आर्थिक पदोन्नती, डॉक्टर कमलेश चंद्र समितीच्या सर्व शिफारशी लागू करणे, गट विमा पाच लाखांपर्यंत वाढविणे, ग्रॅच्युइटीमध्ये वाढ करणे, १८० दिवस सुट्टी साठवून त्याचे सेवाानिवृत्ती वेळी रोखीकरण, टपालसेवक आणि त्याच्या कुटुंबाला वैद्यकीय सुविधा प्रधान करणे, शाखा डाक घरद्वारे देण्यात येणाऱ्या सर्व सेवांना गतीशील करण्याकरीता लॅपटॉप आणि इतर सुविधा प्रदान करण्यात याव्यात, सर्व प्रोत्साहन योजना प्रणाली रद्द करुन ही कामे वर्कलोडमध्ये समाविष्ट करावीत. सेवानिर्वाह लाभमध्ये ग्रामीण टपालसेवक आणि विभागांकडून तीन टक्क्यांऐवजी १० टक्के योगदान असावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेने केली आहे.