लोकसत्ता टीम

वर्धा : ‘त्या’ दोघीही यवतमाळ जिल्ह्यातल्या, दोघीही शेतीत राबणाऱ्या, दोघींनाही दोन अपत्ये, आठ दिवसांच्या अंतराने त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती व्हावे लागले. मात्र, दोघींचाही वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद नसल्यामुळे आखेर डॉक्टरांच्या चमूला ‘ब्रेन डेड’ जाहीर करावे लागले. सर्व उपाय संपल्यानंतर अवयवदानासाठी त्या दोघींच्या परिवारातील सदस्यांची अनुमती घेण्यात आली. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना आप्तांनी अवयवदानाला संमती दिली आणि त्या दोघींच्या मरणोत्तर अवयवदानाने चौघांना नवजीवन प्राप्त झाले.

santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
CM Devendra Fadnvais on Santosh deshmukh murder case Update
Devendra Fadnavis: ‘संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा गुजरातमध्ये आश्रय’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
march against sarpanch santosh deshmukh murder case
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपींच्या फाशीच्या मागणीसाठी पुण्यात मोर्चा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
Ajnup Gram Panchayat , Shahapur Taluka,
ठाणे : जमिनीच्या वादातून माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला
408 people committed suicide in Dhule district during 2024
धुळे जिल्ह्यात वर्षभरात ४०८ जणांची आत्महत्या; पुरुषांची संख्या सर्वाधिक
Nagpur Municipal Corporation Penalty waiver tax collection
नागपूर महापालिकेकडून कर वसुलीसाठी दंड माफी, काय आहे योजना?

गत आठवड्यात कळंब तालुक्यातील मुसळी या गावातील रहिवासी मनीषा कोकांडे (वय ३० वर्षे) यांना अपघातात गंभीररित्या जखमी झाल्यामुळे सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. शेतातील कामे आटोपून कळंब येथून दुचाकीने घरी परतताना रस्त्यात गाडी उसळली आणि त्या खाली पडल्या. त्यांना प्रथम यवतमाळ येथील रुग्णालयात नेण्यात आले व तेथील डॉक्टरांच्या सूचनेनुसार सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात भरती केल्यावर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु डोक्यातील अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. त्यांची प्रकृती न्यूरोलॉजीकलदृष्ट्या खालावत गेली. तज्ज्ञांच्या चमूने तपासणी केली असता त्यांचा मेंदू पूर्णपणे मृत झाल्याचे निदान झाले. वर्षभरापूर्वीच मनीषाच्या पतीचे निधन झाले असताना पाच आणि तीन वर्षांच्या तिच्या दोन मुलांवर पुन्हा काळाने घाला घातला. तिच्या जिवंत राहण्याच्या आशाच मावळल्याने अखेर रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे व डॉ. रूपाली नाईक यांनी समुपदेशन करीत मनीषाच्या वृध्द मातापित्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत अवयवदान करण्यास विनंती केली.

आणखी वाचा-राहुल गांधी म्‍हणतात, “त्‍यांनी वीस-पंचवीस जणांना अरबपती बनवले आम्‍ही कोट्यवधी लोकांना लखपती करणार…”

मनीषाची आई मंदा व वडील रमेश पेंदारे यांनी सामाजिक भान जोपासत अवयवदानासाठी संमती दिली. झेडटीसीसी अर्थात क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या परवानगीने नंतरची कार्यवाही करण्यात आली. मनीषाच्या अवयवदानातून प्राप्त झालेल्या एका किडनीचे सावंगी रुग्णालयातच उपचार घेणाऱ्या ४९ वर्षीय गरजू स्त्रीरुग्णावर यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आले. तर दुसरी किडनी नागपुरातील अन्य रुग्णालयात भरती असलेल्या २३ वर्षीय तरुणीवर प्रत्यारोपित करण्यात आली.

या अवयवदानाला आठ दिवसांचा कालावधी लोटत नाही तर पुन्हा एकदा अवयवदानासाठी सावंगी रुग्णालयाला पुढाकार घ्यावा लागला. वणी तालुक्यातील सेलू (शिरपूर) येथील शेतमजुरी करणाऱ्या सुधा गुहे (४३ वर्षे) यांना गत शुक्रवारी (दि. १९) ब्रेन हॅमरेजमुळे गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले. न्यूरो विभागाद्वारे तातडीने तपासण्या करण्यात आल्या असता मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. वैद्यकीय उपचार सुरू असताना रुग्णाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर रविवारी डॉक्टरांच्या चमूने रुग्णाच्या मेंदूपेशी मृत झाल्याचे घोषित केले. रुग्णाची अवस्था लक्षात घेऊन समुपदेशकांनी पती संजय, मुली नेहा व मानसी यांना त्याबाबत कल्पना दिली. त्यांनी आप्तस्वकीयांशी विचारविनिमय करीत हृदय, यकृत (लिव्हर), मूत्रपिंडे (किडनी) व फुफ्फुसे हे अवयव दान करीत असल्याची लेखी सहमती दिली. गुहे कुटुंबाने घेतलेल्या पुढाकारामुळे सुधा यांच्या अवयवदानातून एक किडनी नागपूर येथील न्यू इरा हॉस्पिटलमधील ३८ वर्षीय महिला रुग्णाला प्राप्त झाली तर याच रुग्णालयातील ४१ वर्षीय पुरुष रुग्णावर लिव्हर प्रत्यारोपण करण्यात आले.

आणखी वाचा-भाषण रंगात आले अन् अचानक गडकरी भोवळ येऊन पडले…

क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, सचिव डॉ. राहुल सक्सेना, सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. अवयव प्रत्यारोपणात शल्यचिकित्सक, नेफ्रोलॉजिस्ट, बधिरीकरणतज्ज्ञ, परिचारिका यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली तर रुग्णालय व्यवस्थापन, पोलीस प्रशासन, प्रत्यारोपण समिती, समन्वयक, प्रशासकीय अधिकारी, वाहन चालक यांच्या चमूने सर्वतोपरी सहकार्य केले. इतरांना नवजीवन देणाऱ्या अवयवदानकर्त्यांना रुग्णालयाच्यावतीने सन्मानपूर्वक आदरांजली अर्पण करण्यात आली.

Story img Loader