यवतमाळ : खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा ठरलेल्या यवतमाळ-अमरावती मार्गावर ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात कारमधील तरुणासह तरुणी ठार झाले तर एक तरुणी गंभीर जखमी झाली. बुधवारी रात्री यवतमाळ-नेर दरम्यान सोनवाढोणा येथे हा अपघात झाला. अपघातात आचल दयाराम निनावे (१९), रा. बोरगाव, ता. नेर व करण प्रमोद मेडवेया (१७) यांचा जागीच मृत्यू झाला. साक्षी खरवडे (१९), रा. माळीपुरा, यवतमाळ ही गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> वन्यप्राण्यांचा बळी घेण्यापासून “समृद्धी” काही थांबेना, एकाच दिवशी १४ रानडुकरांचा बळी

यवतमाळवरून ट्रक (क्र.एमएच २७-एक्स ७२००) अमरावतीकडे जात होता. नेरवरून यवतमाळकडे येणारी कार (क्र. एमएच ०६-एएन ५९८२) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. ट्रक वेगात होता, वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. अपघातात कार संपूर्णपणे क्षतिग्रस्त झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी तरुणीला यवतमाळवरून नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. महिनाभरापूर्वीच या मार्गावर यवतमाळच्या चार जणांचा मृत्यू झाला होता.