लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशीम : शहरातील वस्ती विरहीत भागातील रस्त्यावर करोडो रुपये खर्च केल्या जात आहेत. तर मानवी वस्तीतील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागात लाखो रुपये खर्चून बांधलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडली आहेत. हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या पाण्यामुळे निकृष्ट रस्त्याचे पितळ उघडे पडले असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे.

आणखी वाचा-गोंदियाच्या नवेगाव उद्यानात आढळले दुर्मिळ फुलपाखरू; वैशिष्ट्ये काय? वाचा सविस्तर…

शहरातील पुसद नाका,शिवराणा चौक, लोणसुने चौकापर्यत गेलेल्या या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. हा रस्ता खड्यात की खड्यात रस्ता स्थिती आहे. पावसामुळे साचलेले पाणी व मधुन गेलेली भुमिगत गटार त्यामुळे रस्त्यावरून जातांना नागरीकानां जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. दोन वर्षापासुन माजी न प सदस्य अ‍ॅड विनोद खंडेलवाल यांनी नगर परिषद मुख्याधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, यांच्याकडे निवेदन देवुनही कुठलीच कारवाई होत नाही. अशीच अवस्था शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली असून अनेक नवे कोरे रस्ते पावसाच्या पाण्यामुळे खड्डेमय झाली आहेत.रस्त्यावरील डांबर खरडून गेल्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अन्यथा आमरण उपोषण

येत्या १५ सप्टेंबर पर्यत गिट्टी मुरुम टाकुन खड्डे बुजवले नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल. असा ईशारा अ‍ॅड. विनोद खंडेलवाल, गणेश भोयर, धनेश पाटणी, राजेंद्र भंडारी, बेबीताई राऊत, कुसूमताई सावळे, नारायण नप्ते, अशोक ठाकुर, मोहन क्षिरसाठ, सुरेश तनमने, मयुर बजाज, गिरीश जैन, मधुसुदन काकणी, संतोश राजगुरु, देवेंद्र ठाकुर, दिलीप गहलोत, अश्विन मंत्री, झांझरी, अशोक चढ्ढा, राजीव अग्रवाल, बियाणी, गायनबा शिंदे, डॉ. इढोळे, गोकुल पाटील, एकनाथ मिसर, आर एस देशमुख, राजाराम राऊत आदींनी दिले
आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potholes on the road after light rain in vashim city pbk 85 mrj
Show comments