अकोला : पावसामुळे किंवा इतर कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना काळजी करण्याचे कारण नाही. तक्रार करण्यासाठी ग्राहकांना महावितरणने टोल फ्री क्रमांक, मोबाइल ॲप, मिस कॉल व एसएमएसची सुविधा उपलब्ध करून ‍दिली आहे. ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार याच पर्यायांद्वारे करावी, असे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिस कॉलद्वारे तक्रार करण्यासाठी ०२२-५०८९७१०० हा क्रमांक असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी मोबाईलवर MREG टाईप करून त्यानंतर स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा आणि ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा. या पद्धतीने किंवा http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील कंज्युमर पोर्टल, महावितरणचे मोबाईल ॲप अथवा १९१२, १८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल-फ्री क्रमांकांवर मोबाईल क्रमांक नोंदवता येतो.

हेही वाचा – लाचखोरीत महसूल आणि पोलीस विभाग अव्वल! नाशिक पहिल्या तर पुणे द्वितीय स्थानावर

याशिवाय NOPOWER टाईप करून व स्पेस देऊन बारा अंकी ग्राहक क्रमांक टाकावा. हा एसएमएस ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवून खंडित वीजपुरवठ्याची माहिती देता येईल. स्वयंचलित प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवून ग्राहकांना संदेश पाठवण्यात येतो. संबंधित क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वयंचलित प्रणालीमार्फत सूचना जाऊन वीजपुरवठा सुरळीत केला जातो. याशिवाय महावितरणचे मोबाईल ॲप तसेच टोल फ्री क्रमांकावर खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच ग्राहक महावितरणच्या वेबसाईटवरील वेब सेल्फ सर्व्हिसवरही खंडित वीजपुरवठ्याची माहिती देऊ शकतात.

हेही वाचा – खळबळजनक! नोकरीसाठी नागपुरात आलेल्या महिलेवर ‘गँगरेप’

पावसाळ्यात वादळ-वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. तथापि, ग्राहकांनी १५ ते २० ‍मिनिटे वाट पाहूनच महावितरणला माहिती द्यावी. ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, एसएमएस किंवा मिस कॉल सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power outage during monsoon dont worry complain in different ways ppd 88 ssb
Show comments