नागपूर : नागपुरातील रेशीमबागमधील हेडगेवार स्मृती मंदिराला लागून असलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) विदर्भातील पहिल्या कार्यकर्ता मेळाव्याला कार्यकर्त्यांनी गर्दी केली. वाहनतळातही कार्यकर्ते गर्दी करत होते. सभेत बीआरएस पक्षप्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव काय बोलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – भंडारा : प्रसारित झालेल्या ‘ऑडिओ क्लिप’मधला एजंटच निघाला भाजीविक्रेता, कोतवाल भरती प्रकरण; लग्नासाठी हवे होते ५० हजार रुपये

नागपुरात बीआरएस पक्षाच्या राज्यातील पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन बीआरएस पक्षप्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते झाले. तेथून ते कार्यकर्त्या मेळाव्यात पोहोचणार आहे. ते येण्यापूर्वीच भट सभागृहात कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्या शिल्लक नव्हत्या. त्यामुळे ते दोन खुर्च्यांच्या मधील जागेत बसले होते. काहींनी वाहन तळावर ठिय्या दिला आहे. सर्वांचे के. चंद्रशेखर राव काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे. दौऱ्याच्या निमित्ताने नागपूर शहरात ठिकठिकाणी ‘अब की बार किसान सरकार’चे फलक लागले आहे.