गणपती हा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असल्याने प्रभात किड्स स्कूलच्या सांस्कृतिक विभागाने यावर्षी ‘सृजनात्मक गणेश पूजन’ या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा केला. बालचित्रकारांनी गणेशाच्या छायाचित्र रेखाटले. त्याचवेळी प्रभातच्या संगीत विभागाच्या चमूने गणेश गीते सादर केलीत, तर नृत्य विभागाने गणेशवंदना सादर केली.
हेही वाचा >>> वाशिम: म्हशीने सोन्याची पोथ खाल्ली अन् एकच धांदल उडाली, नंतर मात्र…
प्रभात किड्समध्ये बाल चित्रकारांनी तयार केलेल्या चित्रांचे विधिवत पूजन करून गणेश स्थापना करण्यात आली. संचालक डॉ. गजानन नारे, वंदना नारे, नीरज आवंडेकर, शिल्पा आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, समन्वयक मोहमद आसिफ, सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे आदींनी गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. आपण रेखाटलेल्या गणेश चित्रांचे पूजन होत असताना पाहून बालकलावंतांच्या चेहर्यावर कृतज्ञतेचे भाव होता. आपल्या कलाकृतीचे अशा प्रकारे पूजन होणे, त्या कलाकृतीची आरती होणे हा त्या कलावंताला धन्य करणारा प्रसंग असतो. तोच आज प्रभातच्या पाचही बाल चित्रकारांनी अनुभवला. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांच्या गणेश चित्रांना दाद दिली. या उत्सवाचे सूत्रसंचालन संजीवनी अठराळे व झिनल सेठ यांनी केले.
हेही वाचा >>> सणासुदीच्या काळात दोन विशेष रेल्वेला मुदतवाढ, उत्तर-पश्चिम भारतात जाण्यासाठी…
‘भरतनाट्यम्’ने शिवपूजा
दिव्या गणोजे हिने सादर केलेल्या भरतनाट्यम् या नृत्य प्रकाराला उपस्थित विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. दिव्याने सुंदर भावमुद्रा आणि पदन्यासाद्वारे गणेशांचे पिता असणार्या भगवान शंकराला प्रारंभी अनोखी वंदना दिली व कार्यक्रमात अनोखा रंग भरला.