नागपूर: विदर्भ साहित्य संघाच्याअध्यक्षपदी प्रदीप दाते यांची कार्यकारिणीच्या तातडीच्या बैठकीत निवड करण्यात आली. मनोहर म्हैसाळकर यांच्यानिधनानंतर वि. सा. संघाचे अध्यक्षपद रिक्त झाले होते.विदर्भ साहित्य संघाच्या येथील कार्यालयात सरचिटणीस विलास मानेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यात प्रदीप दाते यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रदीप दाते हे विद्यमान कार्यकारिणीत शाखा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना संस्थात्मक कार्याचा दीर्घ अनुभव असून ते गेल्या चार दशकांपासून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहे. यशवंतराव दाते स्मृती प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष असून अनेक संघटनांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. विदर्भ साहित्य संघाशी गेल्या तीन दशकांपासून ते संबंधित असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात ते विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा