गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या २३ नोव्हेंबर ला लागणाऱ्या निकालात जागा कुणाच्या किती येतात त्याच्या निर्णय जनतेच्या दरबारात होऊ देत त्याच्यानंतर या सर्वांवर चर्चा करणे योग्य होणार आहे. अजून मूल जन्माला आलं नाही त्याच्या आधी त्याचा साक्षगंध कुठे करणार, लग्न कुठे करायचं या सगळ्यांवर आज घडीला चर्चा करणे किंवा त्या दृष्टीने त्यावर भाष्य करणे हे माझ्या मते योग्य होणार नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे खासदार प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या मुख्यमंत्री होईल या वक्तव्यावर टोला लगावला आहे.

खासदार प्रफुल पटेल हे ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाच्या दिवाळी मिलन समारंभात गोंदियात आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले, आधी पवार कुटुंबीय दिवाळीच्या पाडवा सोबत करीत होते पण आता राजकीय दिवाळी तर झाली पण त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे, या प्रश्नाच्या उत्तरात खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की पवार कुटुंब यांच्या आंतरिक विषयावर मी काहीही भाष्य करू इच्छित नाही, पवार कुटुंबीयांशी माझे गेल्या ५० वर्षापासून अत्यंत जवळचे संबंध राहिलेले आहेत आज ही तसेच कायम आहेत आणि भविष्यात ही राहणार आहे. फक्त आता त्यांच्या आंतरिक कुटुंबात काही दुरावा निर्माण झाला असेल तर त्यावर त्यांनीच मार्ग काढावा मला त्यांच्या मध्ये बोलणं योग्य वाटत नाही असे पटेल म्हणाले.

हेही वाचा…बुलढाणा : चिखली मतदारसंघात, बसप उमेदवारावर हल्ला…

u

पुढे पटेल म्हणाले मागील अडीच वर्षात महायुती शासनाने जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना दिलेल्या आहेत त्यामध्ये ती योजना महाराष्ट्राच्या मोठ्या बजेट मुळे देता आली आहे . हे आमच्या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी वेळोवेळी मंचावरून स्पष्ट केलं आहे आमची आताची लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची योजना, काँग्रेसजन यावर टीका करतात पण तुमचे शासन असताना तुम्हाला हे का करता आलं नाही. तुम्ही हे केलं असतं तर का केलं नाही आज महायुतीने ही योजना आणली तर ती बंद होऊन जाणार असे म्हणणे म्हणजेच की “द्राक्ष कुठे न कुठे आंबट आहेत” अशाचाच प्रकार आहे.

आज महाराष्ट्राची ओळख ही एक सक्षम राज्याची झालेली आहे आमच्या महायुती शासनाने ज्या योजना मागील अडीच वर्षात दिलेल्या आहेत ते आम्ही पुढील पाच वर्षे ही चालू ठेवणार असल्याचेही पटेल याप्रसंगी म्हणाले. आमच्या पुढील सत्तेत आम्ही शेतकऱ्यांच्या धानाला मिळणारे बोनस २० हजार वरून २५ हजार देणार आहोतच अशा प्रकारे आम्ही जे बोलतो ते करतोच असे पटेल म्हणाले, नवाब मलिकांना शिंदे सेना मदत करणार नाही असे जाहीर केले आहे यावर बोलताना खासदार प्रफुल पटेल म्हणाले की नवाब मलिक हे आमचे पूर्वीपासूनचे सहकारी राहिलेले आहेत ते आमदार होते, मंत्री राहिलेले आहेत त्यांच्यावर अद्यापही कोर्टाद्वारे कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही आणि आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे. नवाब मलिकांना भाजप आणि शिवसेनेला मदत करायची नसेल किंवा तिथून त्यांच्या उमेदवार द्यायची असेल तर ते त्यांची इच्छा आहे पण यामुळे महाराष्ट्रात महायुतीमध्ये इतर कुठल्याही ठिकाणी याचा परिणाम होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. पुढच्या मुख्यमंत्री कोण होणार यावर बोलताना खासदार पटेल म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचे उद्धव ठाकरे आणि अनेक दावेदार आहेत काँग्रेसकडे दावेदार असणार तर त्यांनी त्यांचे नाव जाहीर करावे.

हेही वाचा…विमानात बॉम्बची धमकी देणारा …, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल काय म्हणाले जाणून घ्या

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नक्कीच फेक नेरेटिव्ह होताच संविधानात बदल करणार, आरक्षण संपणार अशा प्रकारे विरोधी पक्षाद्वारे खोटे प्रचार करण्यात आला होता. ४०० पार या घोषणेमुळे या यावर जनतेच्या विश्वास पण बसत होता.त्यामुळे महाराष्ट्रात आणि इतर काही ठिकाणी याचा निकालावर परिणाम सुद्धा झाला पण ते लोकसभेची निवडणूक होती आता महाराष्ट्रात विधानसभेची निवडणुकीत आहे. आणि यावेळी अशा कोणत्याही विषयाच्या कोणत्याही परिणाम होणार नाही असेही खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले.