गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल  यांच्या गृहजिल्ह्यात म्हणजेच गोंदियात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह सुमारे ३०९ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यात राष्ट्रवादीतील फुटीनंतर हे सर्व कार्यकर्ते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच होते. मात्र सध्या राज्यातील वरिष्ठ पातळीवरील भाजप-राष्ट्रवादीच्या मैत्री मुळेस्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप करत या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा हात पकडलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाजपकडून होत असलेला त्रास आणि खासगीकरणाचा सपाटा, यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे गोंदियात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल हटवार यांनी १०० कार्यकर्त्यांसह तसेच भाजपच्या सुमारे १०० कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला बळ मिळाले असून राष्ट्रवादी, भाजप व मनसेला मोठा धक्का बसला आहे.