लोकसत्ता टीम
वर्धा : केंद्राच्या ईपीएफ पेंशन बाबत असलेली समस्या जुनीच आहे. मात्र ती लवकरच सुटेल.त्यासाठी केंद्रीय कामगार मंत्र्यांसोबत बैठक लावून धरू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
माजी खासदार सुबोध मोहिते यांनी पक्षातर्फे परिवर्तन मेळाव्याचे आयोजन केले होते. यात बोलतांना पटेल यांनी वर्धा जिल्ह्यात कापूस व सोयाबीन या पिकांवर आधारित उद्योग आणणार. विनोबा धरण उभारून सिंचन वाढविणार, जिल्हा आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणार, अशी आश्वासने दिली.
आणखी वाचा-‘इंडिया’द्वारे एकजूट दाखवण्याचा प्रयत्न, पण विरोधकांमध्ये मतैक्य नाही
यापुढे पक्षात नव्या दमाच्या लोकांना संधी देणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण तसेच प्रशांत पवार, बाबा गुजर, ईश्वर बळबुधे, क्रांती धोटे, प्रकाश येंडे, शरद शहारे, आशिष ठाकरे, मयूर डफले, रोशन तेलंगे, नीलकंठ पिसे, देवीलाल जयस्वाल,उज्वल काशीकर,बलराज लोहे, दिलीप पोटफोडे व अन्य नेते उपस्थित होते.