लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: कोराडीतील प्रस्तावित औष्णिक वीज प्रकल्प कोराडीत नको म्हणून केंद्रीय नितीन गडकरीसह काँग्रेसने दंड थोपटले असताना ‘प्रहार’ ने मात्र हा प्रकल्प कोराडीत करा, अशी करण्याची मागणी केली आहे.

प्रहार जनशक्तीचे महादुला नगर पंचायतचे मंगेश देशमुख यांनी हा प्रकल्प पारशिवनीच्या ऐवजी कोराडीत करा, असे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दिले आहे. गडकरी यांनी हा प्रकल्प कोराडीऐवजी पारशिवनीत करा, अशी मागणी केली होती, देशमुख यांनी पारशिवनीत नको तर कोराडीतच करा, अशी भूमिका घेतली आहे.

हेही वाचा… चंद्रपूर : भद्रावती जवळ सापडली पुरातन २० कोटी वर्ष दरम्यानची पानांची सुंदर जिवाष्मे

कोराडीत जागा उपलब्ध आहे, महापालिकेकडून पाणी उपलब्ध करून दिले जाते. अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय आहे, त्यामुळे प्रस्तावित प्रकल्प कोराडीतच होणे योग्य ठरेल, असा दावा देशमुख यांनी केला आहे. नवीन प्रकल्पाच्या विरोधात विविध स्वयंसेवी संस्थांकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ‘विदर्भ कनेक्ट’ या संघटनेसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व आमदार विकास ठाकरे यांनीही प्रकल्पाला विरोध केला आहे, हे विशेष.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prahar janshakti demanded power project should be done in koradi nagpur mnb 82 dvr