अकोला : सध्याची संसदीय लोकशाही पद्धत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेत आल्यास चीनसारखी पक्षीय लोकशाही किंवा अध्यक्षीय लोकशाही येण्याची शक्यता आहे. अधिकार शाबूत ठेवण्यासाठी संघर्षातून टकराव त्यातून अराजकता माजण्याची दाट शक्यता लोकसभा निवडणुकीनंतर आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोल्यात ते सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मागच्या दाराने ईस्ट इंडिया कंपनी कशी येत आहे, याची आम्ही नव्याने मांडणी करीत आहोत. आगामी पाच वर्षांत भाजप सत्तेत आली तर, त्याच पद्धतीने वाटचाल राहील. १९४८ साली मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्र वाटून देण्यात आले होते. त्या प्रमाणात, त्या समूहाला अर्थव्यवस्थेत जागा निर्माण करण्यात आली होती. भाजप सत्तेत आल्यापासून नुसती खासगीकरणाला सुरुवात झाली नाही, तर मिनिमम शासन असा नवीन जोड देण्यात आला आहे. आम्ही नरेंद्र मोदी यांना विचारतोय की, ५ ते ६ औद्योगिक घराण्यांमध्ये भारताला विभाजित केले जाणार आहे का ? याचा खुलासा त्यांनी करावा.

हेही वाचा – आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “शरद पवार गटात प्रवेश…”

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

आगामी पाच वर्षांच्या कालावधीत जे सामाजिक आणि राजकीय अराजक माजेल त्याला आर्थिक उत्तर दिले जाईल. जे ७ ते ८ औद्योगिक घराण्यांना प्रोत्साहन दिले जात आहे, त्यांच्याकडे भारतीय राज्यव्यवस्था दिली जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. १९५० साली राज्यघटना स्वीकारली त्याचवेळी आम्ही घटना मानणार नसल्याचे आरएसएसने म्हटले होते. आता मोदींच्या नेतृत्वाखाली संविधान बदलण्याचा घाट घालण्यात आला आहे.

‘आरएसएस’ हे भौगोलिक सीमा मानत नाही, तर सांस्कृतिक सीमा मानते. ज्यांना भौगोलिक सीमा मान्य नाही, त्यांना आर्थिक सीमा मान्य आहे. हा गंभीर प्रश्न असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – वडेट्टीवारांना विरोध, तर धानोरकरांना समर्थन, वाचा काय घडतेय चंद्रपुरात?

हेही वाचा – पाकिस्तानातील महिलेला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला अटक

‘मविआ’तील तिन्ही पक्षांत वाद; काँग्रेसला आघाडीसाठी पत्र

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांशी वंचितचे संबंध सुरळीत आहेत. त्यांचे भांडण माझ्याशी नाही, तर आपापसांत असल्याचा दावा ॲड. आंबेडकर यांनी केला. ‘मविआ’मध्ये जागा वाटपाचे अद्याप काही निश्चित नाही. अनेक जागांवरून त्यांच्यात वाद सुरू आहेत. त्यामुळे आम्ही काँग्रेस अध्यक्ष व प्रभारींना पत्र देऊन आपण आघाडी करून जागा वाटप करू, असा लेखी प्रस्ताव दिला. मात्र, त्यावर काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar akola prakash ambedkar criticizes bjp over the constitution ppd 88 ssb