अकोला : श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालामध्ये १९९२ च्या दंगल प्रकरणामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना व इतर हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचे नाव आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने पुरावे असतांनाही कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. मतदानापूर्वी काँग्रेसने याचे उत्तर द्यावे असे,आव्हान दिले.
बाळापूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प १९९२ मधील दंगलीमध्ये एक हजार मुस्लीम मारले गेले होते. ३०० जण बेपत्ता झाले. त्यावर चौकशीसाठी सरकारने श्रीकृष्ण आयोग स्थापन केला. त्या प्रकरणात अनेकांवर दोषारोप लावण्यात आले. त्यावेळच्या काँग्रेस सरकारने नसिम अलिफ खान यांच्यामार्फत याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने न्यायालयात पोलिसांवर विश्वास नसल्याचे बयाण दिले. १९९९ नंतर सर्वोच्च न्यायालयात सरकारने गंभीरतेने हे प्रकरण चालवले नाही. १२ ऑगस्ट २०१२ ला ती याचिका फेटाळण्यात आली.
हेही वाचा…सोन्याचे दर निच्चांकीवर असतांनाच पुन्हा बदल… हे आहेत आजचे दर…
u
शासनाने सर्वाेच्च न्यायालयात माफीनामा देऊन हे प्रकरण गांभीर्याने चालवण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतरच्या सरकारने ते आश्वासन पाळले नाही. २२ ऑगस्टला ती याचिका फेटाळण्यात आल्याने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडितांची घोर निराशा झाली. श्रीकृष्ण आयोगाने एक हजार लोकांचा मृत्यू व ३०० जण बेपत्ता झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. पुरावे असल्यावरही काँग्रेसने दोषींवर गुन्हे दाखल का केले नाही, असे आमचे प्रश्न आहेत. काँग्रेसने २० तारखेपूर्वी त्याचे उत्तर द्यावे, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. श्रीकृष्ण आयोगाने दंगलीचे वास्तव मांडले. श्रीकृष्ण आयोगाने दंगलीमागे शिवसेनाचा हात असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी आता त्याच शिवसेनेसोबत आहे, अशी टीका देखील ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते.
हेही वाचा…नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?
सत्तेत सहभागी होणार
राज्यात आगामी काळात वंचित बहुजन आघाडी सत्तेत सहभागी होणार आहे. सत्ता कुणाची राहील आणि आम्ही कोणासोबत सत्तेत सहभागी होऊ, हे निकालानंतर स्पष्ट होईलच, असे सूतोवाच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. सत्ताधाऱ्यांचा पैसा पोहोचवण्याचे काम पोलीसच करीत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.