लोकसत्ता टीम

बुलढाणा : राज्यातील दोन आमदारांच्या गाड्या फोडणे हा राज्यात दंगल घडविण्याचा प्रयत्न होता, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला आहे.

Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

वंचित आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चैत्यभूमी, मुंबई येथून प्रारंभ झालेल्या बहुचर्चित ‘आरक्षण बचाव यात्रा’ चे मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी त्यांचे व आरक्षण यात्रेचे जिल्ह्यात ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले. यात्रे दरम्यान बुलढाणा येथे काल संध्याकाळी पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. बुलढाणा अजिंठा राज्य मार्गावरील ओंकार लॉन्स येथे काल संध्याकाळी ही सभा पार पडली.

यावेळी विविध सामाजिक आणि राजकीय पैलू, सामाजिक आरक्षण वर मत प्रदर्शन करताना आंबेडकर यांनी आमदारद्वय मिटकरी आणि आव्हाड यांच्या वाहनवरील हल्ल्याचा संदर्भ देत यावर वेगळे भाष्य करून एकच खळबळ उडवून दिली. यावेळी आंबेडकर म्हणाले की, या दोन घटनाद्वारे राजकीय भांडण हे सामाजिक भांडण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातून राज्यात दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमदार अमोल मिटकरी आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्या फोडणे हा दंगल घडविण्याचा एक भाग होता, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

आणखी वाचा-ठरलं! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६५ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा ‘येथे’ होणार…

धर्म नव्हे आरक्षण धोक्यात!

पुढे ते म्हणाले की, ज्यांना आपण सत्तेवर बसविले ते आपल्या विचारांचे नसेल तर वाटोळे व्हायला व्हायला वेळ लागणार नाही. पुढे ते म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी ७ ऑगस्टला ओबीसी आरक्षण जाहीर केले. त्यामुळे एक पिढी सत्तेत आली. मात्र आता धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आले आहे, असा इशारा आंबेडकर यांनी यावेळी बोलताना दिला. आता अनुसूचित जाती , इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाला धोका आहे.

ओबीसीची मागणी आहे की जनगणना व्हायला पाहिजे. ओबीसी आणि ओबीसीला मानणारे शंभर आमदार विधानसभेत गेले पाहिजे.राहिलेले ५७ आमदार हे अनुसूचित जाती, जमातीचे आहेत. यात ५७ आमदार वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले पाहिजेत. ते पण ओबीसींच्या मतांवर निवडून आले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. असे झाल्यास आगामी काळात सत्ता आपलीच आहे, असा आशावाद आंबेडकर यांनी यावेळी बोलून दाखविला. आपल्याला मतदान ओबीसी म्हणून करून घ्यायचे आहे.जो पक्ष आपली भूमिका घेत नाही तो आपला पक्ष नाही, असे परखड मत त्यांनी मांडले.

आणखी वाचा- शाळेसमोरील मार्ग, की ‘यममार्ग’? नागपूरच्या अजनी रेल्वे मेन्स शाळेसमोरील वळण विद्यार्थ्यांसाठी धोकादायक…

मनोज जरांगे यांनी जरूर राजकारणात यावे

मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या राजकारण प्रवेशाच्या घोषणेचे स्वागतच असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. बुलढाणा येथील सभेनंतर प्रसिद्धी माध्यमाशी ते बोलत होते.

ते म्हणाले की, मी अनेक दिवसांपासून म्हणत होतो की मनोज यांनी निवडणुका लढवाव्यात, त्यांच्यासाठी ते चांगल असेल. त्यांची एक चळवळ आहे, लढा आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणात येणे योग्यच ठरेल. त्यांच्या या निर्णयाबद्धल काही जणांचे मतभेद असू शकतात, काहींचे समर्थन असेल. वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभा निवडणुकीतील भूमिकेचा अजून विचार केला नाही. संभाजीनगर येथील सभेनंतर स्वतंत्र लढायचे की आघाडी करून हा निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांनी मला ज्ञान शिकवल्या बद्दल धन्यवाद, अशी मोजकी प्रतिक्रिया त्यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर दिली.