अकोला : ”देवेंद्र फडणवीस सत्तेच्या नशेत? सत्तेने भ्रष्ट की दोन्हीची इतकी मस्ती?”, असा सवाल करीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर खरमरीत टीका केली. याच मुजोर वृत्तीचा अकोला शिकार असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा – बुलढाणा-मलकापूर राज्य मार्गावर भीषण अपघात, अतिरक्तस्त्रावामुळे आरोग्य कर्मचारी घटनास्थळीच ठार

Eknath Shinde, metro project, Eknath Shinde on metro,
चौकशी लावली असती तर मेट्रो प्रकल्प सुरू झाला नसता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
kiren rijiju controversial remarks on rahul gandhi
राहुल गांधींसारखे विरोधी पक्षनेते देशाला शाप! संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांची टीका
ncp sharad pawar peace walk in mumbai
मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा
Mahayutis demonstration of strength today on the occasion of the inauguration of the metro line
मेट्रो मार्गाच्या उद्घाटनानिमित्त महायुतीचे आज शक्तिप्रदर्शन
Prakash Ambedkar criticism of Jarange Patil over the election
जरांगेंनी निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावरील हे स्पष्ट; ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र
Tirupati Prasad Controversy
Prakash Raj: ‘तुझ्या दिल्लीतील मित्रांमुळे धार्मिक तणाव’, तिरुपती प्रसाद वादावर अभिनेते प्रकाश राज यांची पवन कल्याण यांच्यावर टीका
Devendra Fadnavis Rebuttal to Sanjay Raut
“हिंदूत्त्वाला विरोध करता-करता..”, माजी सरन्यायाधीश आणि मनमोहन सिंग यांचे फोटो दाखवत देवेंद्र फडणवीसांची टीका

हेही वाचा – माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने पती संतापला; सासूसह मेहुण्याची हत्या करून स्वत:ही केली आत्महत्या

नागपूर शहराला नुकताच पुराचा मोठा फटका बसला. त्यानंतर पाहणी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्वसामान्य नागरिकाला दिलेल्या वागणुकीवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा समाचार घेतला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “नागपुरात पुरात अडकलेल्या निष्पाप लोकांचा बळी गेला आहे आणि त्याची दाद मागण्यासाठी गेलेल्या लोकांना इतकी तुच्छ वागणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतात, यातून शिवसेना- भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या सरकारचा मुजोरपणा बरेच काही सांगून जातो. खरं पाहता यात आश्चर्य काहीच नाही. हाच प्रकार मी अगणित वेळा बघितला आहे. कित्येक वर्षांपासून अकोला देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मुजोर वृत्तीचा शिकार आहे.”