अकोला : मतमोजणीनंतर लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. या निकालावरून ‘काही खुशी, काही गमचे वातावरण दिसून येते. या लोकसभा निवडणुकीत एकाही जागेवर आघाडी मिळवू न शकणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स खात्यावर भावना व्यक्त केल्या आहेत. ‘पक्ष जिंकला नाही म्हणून निराश आहे, पण आशा सोडली नाही,’ असे मत ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केले. एनडीएचा पराभव करणाऱ्या सर्व खासदारांचे त्यांनी आभार मानले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. प्रकाश आंबेडकर स्वतः अकोला मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. या निकालावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत अकोल्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो. प्रत्येक वंचितच्या कार्यकर्त्याचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि पक्षाप्रती ठोस समर्पण केल्याबद्दल आभार मानू इच्छितो. नवनिर्वाचित खासदारांचे देखील आभार मानतो, ज्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचा पराभव केला. पक्ष जिंकला नाही म्हणून मी निराश आहे, पण मी आशा सोडलेली नाही.’

हेही वाचा…वर्धा : मविआचे अमर काळे यांची विजयाच्या दिशेने आगेकूच, महायुतीचे तडस समर्थक आता मोर्शीवर आस लावून

सहकारी आणि मी आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करू आणि त्यांचे विश्लेषण करू आणि आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar express his thoughts over vanchit bahujan aghadi s performance on lok sabha election results in maharashtra ppd 88 psg
Show comments