अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. पक्ष कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या फेरीमध्ये वंचित आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या फेरीमध्ये मोठ्या संख्येने गर्दी उसळली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अकोला लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ४ एप्रिल ही शेवटची मुदत होती. आज ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील टॉवर चौक येथील कार्यालयातून फेरीला सुरुवात झाली. याठिकाणी सकाळपासूच मोठी गर्दी जमा झाली होती. टॉवर चौक, फतेह चौक, खुले नाट्यगृह, पंचायत समिती मार्गे ही फेरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाली. तापत्या उन्हामध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर, प्रा. अंजली आंबेडकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी फेरीमध्ये पायदळ सहभागी झाले होते. ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी फेरीला संबाेधित केले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दुपारी ॲड. आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा… … तोपर्यंत मित्र पक्षाच्या प्रचारात सहभागी होऊ नका, वंचितच्या फतव्याने संभ्रम

हेही वाचा… इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

फेरीत लक्षवेधी फलक

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या फेरीत सहभागी कार्यकर्त्यांनी हातात घेतलेले असंख्य फलक लक्षवेधी ठरले. या फलकांवर विविध जाती-धर्मांसह ‘हिम्मतवाला’ असे नमूद करण्यात आले होते.