केंद्र आणि राज्यातील आमच्या डबल इंजिन सरकारने विकास करून दाखवला, काही दिवसांतच या डबल इंजिनला ट्रिपल इंजिनमध्ये बदलू, असा दावा काल-परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बोलताना केला. हे तिसरे इंजिन राष्ट्रवादी काँग्रेसचे की मनसेचे हे एकनाथ शिंदे कृतीतून दाखवून देतील, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

हेही वाचा- ‘भक्तांच्या आड का लपता, धमक असेल तर नागपुरात या’; प्राध्यापक मानव यांचे धीरेंद्र कृष्ण महाराजांना पुन्हा आव्हान

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत युतीची बोलणी सुरू आहे. दोन्ही बाजूंचे गट चर्चा करताहेत. त्यांच्यात अंतिम चर्चा झाली की त्यानुसार घोषणा होईल. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. एकत्रच घोषणा करू, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे म्हणणे आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी मात्र मी बोलणार नाही. त्यांना गरज असेल, तर ते वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करतील. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र स्वबळाची घोषणा केली आहे’.

हेही वाचा- ‘चंद्रपूरकरांनी ‘पदवीधर’मध्ये साथ दिली, नागपूरकर ‘शिक्षक’मध्ये परतफेड करणार’; माजी मंत्री सुनील केदार यांची ग्वाही

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आम्ही नाकारलेले नाही, असे स्पष्ट करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध नव्हता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससोबतची बोलणी फिसकटली होती. काँग्रेस पक्ष ज्या १२ ठिकाणी पाच वेळा पराभूत झाला, त्यातल्या किती जागा वंचित आघाडीसाठी देता, अशी विचारणा आम्ही केली होती. दुर्दैवाने त्यांनी त्यावर चर्चा केली नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला नाकारले आहे, हे स्पष्ट होते’.

हेही वाचा- कोलनच्या कर्करोगावर दहापट प्रभावी औषधांचा शोध ; प्रा. डॉ. संजय के. जैन यांचे संशोधन

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या संदर्भात बोलताना प्रकार आंबेडकर म्हणाले, ‘ही निवडणूक मुद्यांची लढाई आहे. ज्यांनी पेन्शन योजनेला विरोध केला, तेच आता वेगवेगळे दावे करू लागले आहेत. ही योजना अर्थसंकल्पावर अवलंबून नाही. ज्यावेळी खासगीकरणाचे वारे १९९० च्या दशकात वाहू लागले, तेव्हापासून विमा कंपन्यांवर निवृत्तीवेतनाची भूमिका टाकून सरकार नामानिराळे होऊ पाहत होते. पण, आम्ही सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना योग्य पद्धतीने अंमलात आणून दाखवू. नेट-सेटग्रस्त प्राध्यापकांचाही प्रश्न सरकारने प्रलंबित अवस्थेत ठेवला आहे. हे प्रकरण न्यायालयात असले, तरी सरकारने ठोस भूमिका घ्यायला हवी’, असे आंबेडकर म्हणाले.

Story img Loader