अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार नातिकोद्दिन खतीब यांना वंचित आघाडीने बाळापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. खतीब यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन वंचित आघाडीत प्रवेश केला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी बुधवारी १० उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये सर्व मुस्लीम उमेदवार आहेत, हे विशेष.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला. मविआ व महायुतीमध्ये जागा वाटपावरून ओढातान सुरू असतांनाच वंचित आघाडीने उमेदवार जाहीर करण्यास देखील सुरुवात केली. वंचित आघाडीने आज विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली. त्यामध्ये वंचित आघाडीने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
Four candidates from Nashik absent from PM Narendra Modis meeting
मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह
Vijay Wadettiwar, Bramhapuri Vijay Wadettiwar,
विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध? उच्च न्यायालय म्हणाले…

हे ही वाचा…काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर ठाकरे, शरद पवार गटांचा डोळा

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार नातिकोद्दिन खतीब यांनी काँग्रेसला सोडून वंचित आघाडीत प्रवेश केला. वंचित आघाडीने विधानसभा‍ निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नातिकोद्दिन खतीब यांना बाळापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. नातिकोद्दिन खतीब यांना काँग्रेसने विधान परिषदेवर संधी दिली होती. १९९५, २००४, २०१४ मध्ये त्यांना काँग्रेसने बाळापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील दिली होती, तर २००९ मध्ये त्यांच्या पत्नी काँग्रेसकडून बाळापूरमध्ये निवडणूक रिंगणात होत्या.

त्यांचे पूत्र बाळापूरचे नगराध्यक्ष होते. मविआतील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमख विद्यमान आमदार असल्याने हा मतदारसंघ त्यांच्यासाठीच सुटेल, हे निश्चित आहे. त्यामुळे बाळापूरमधून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी नातिकोद्दिन खतीब यांनी वंचितची वाट निवडली. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात होते. काँग्रेस सोडून ते वंचित आघाडीत दाखल होताच त्यांना बाळापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बाळापूरमध्ये २००९ मध्ये भारिप-बमसं‍ समर्थित अपक्ष आणि २०१४ मध्ये भारिप-बमसंचे बळीराम सिरस्कार सलग १० वर्ष आमदार होते. २०१९ मध्ये वंचित आघाडीने त्यांचे तिकिट कापून डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता नातिकोद्दिन खतीब यांच्या माध्यमातून वंचितने बाळापूरमधून मुस्लीम कार्ड खेळले. वंचितच्या खेळीमुळे मविआला मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा…महायुतीत अघोषित युद्ध… नवनीत राणांच्या नव्या डावाने शिंदे गटाची डोकेदुखी…

हे आहेत वंचितचे उमेदवार

वंचित आज जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये मलकापूरमधून शहजाद खान सलीम खान, बाळापूर नातिकोद्दिन खतीब, परभणी सय्यद समी सहेबजान, औरंगाबाद सेंट्रल मो. जविद मो. इशाक, गाणगापूर सय्यद गुलाम नबी सय्यद, कल्याण पश्चिम एैयाज गुलजर मौलवी, हडपसर मो. अफरोज मुल्ला, मन इम्तियाज जफर नदाफ, शिरोल आर‍िफ पटेल आणि सांगली मतदारसंघातून अल्लाउद्दिन काझी यांचा समावेश आहे.