नागपूर : उमरेडचे पराभूत भाजप बंडखोर उमेदवार प्रमोद घरडे यांनी नागपूर विमानतळ मार्गावर लावलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत फलक भाजपमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घरडे यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली होती. त्यांनी घेतलेल्या मतांमुळे या मतदारसंघात काँग्रेसला फायदा झाला व भाजप पराभूत झाली. या पार्श्वभूमीवर बंडखोरावर कारवाई करण्याऐवजी त्यानेच फडणवीस यांचे स्वागत फलक लावणे याचा अर्थ बंडखोरीसाठी घरडे यांना पक्षातूनच फूस तर नव्हती ना ? अशी कूजबूज सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांपैकी पाच जागा महायुतीने जिंकल्या. पराभव झाला तो उमरेडमध्ये. तेथे काँग्रेसचे संजय मेश्राम विजयी झाले. ही जागा काँग्रेसचीच होती. ती या पक्षाने राखली. पण त्यासाठी भाजपमध्ये झालेली बंडखोरी कारणीभूत ठरली. काँग्रेसचे मेश्राम यांना ८५,३७२, भाजपचे अधिकृत उमेदवार व माजी आमदार सुधीर पारवे यांना ७२,५४७ मते मिळाली. १२ हजार मतांनी मेश्राम विजयी झाले. बंडखोर उमेदवार प्रमोद घरडे यांनी ४९,२६२ मते घेतली. ही मते भाजपची होती. ती पारवेंना मिळाली असती तर उमरेडमध्ये भाजपचा विजय झाला असता. आता बंडखोर कोण हा प्रश्न उपस्थित होतो.

हेही वाचा – विधानसभाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांसह भाजप, शिंदे गटाचे मंत्री आमदार स्मृती मंदिर स्थळी; अजित पवार गटाचे राजू कारेमोरे सहभागी

हेही वाचा – लोकजागर : मुनगंटीवार कुणाचे ‘बळी’?

प्रमोद घरडे हे भाजपचेच नेते आहे. त्यांचा उमरेड भागात जनसंपर्क आहे. ते निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यांनी पक्षाकडे अर्जही केला होता. पण या भागातून दोन वेळा आमदार असणारे सुधीर पारवे यांना पक्षाने संधी दिली. पारवे हे भाजपमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक मानले जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गडकरी समर्थक दोन उमेदवारांचा पराभव झाला. त्यापैकी पारवे एक आहेत. त्याना पराभूत होण्यासाठी कारणीभूत ठरलेले घरडे यानी विमानतळ मार्गावर फडणवीस यांच्या स्वागताचे मोठे फलक लावले आहे. एकच नव्हे तर अनेक फलक लागलेले आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह स्वत: घरडे यांचेही मोठे छायाचित्र आहे. या फलकावरून घरडे यांच्या बंडखोरीला पक्षातूनच पाठिंबा होता का ? अशी चर्चा आता उमरेड भाजपमध्ये सुरू झाली आहे. पक्षातून पाठिंबा असल्याशिवाय घरडे इतके मोठे फलक लावू शकत नाही, असे बोलले जात आहे. जिल्ह्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद आहे. गडकरी समर्थकांना पाडण्यासाठी एक यंत्रणा काम करीत होती. त्यातूनच घरडे यांना उमरेडमध्ये बळ देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.