बुलढाणा : खामगावमध्ये सोमवारी पार पडलेल्या बहुजन मुक्ती पार्टीच्या जिल्हा अधिवेशनात वर्तमान राजकीय परिस्थितीवर विचारमंथन करण्यात आले. यावेळी अधिवेशनाचे उद्घाटक अ‍ॅड. प्रसेनजीत पाटील यांनी परखड विचार मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खामगाव येथील माळी भवनमध्ये ‘बमुपा’च्या युवा आघाडीचे राष्ट्रीय सचिव सौरभ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडले. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रताप पाटील, जिल्हाध्यक्ष विनोद पवार, युवा अध्यक्ष सागर मोरे, महिला आघाडीच्या सारिका जवंजाळ, कार्याध्यक्ष सुनील बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. नियोजित राज्य अधिवेशनाच्या अनुषंगाने हे अधिवेशन घेण्यात आले. उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रसेनजीत पाटील यांनी आपल्या मनोगतात सत्ताधाऱ्यांच्या खुल्या व छुप्या धोरण आणि अजेंडाचा पर्दाफाश केला. मागील दहा वर्षांपासून दाखवायचे एक अन् करायचे वेगळेच, अशा पद्धतीने काम सुरू आहे. शासनाकडून आरक्षणाबाबत “फोडा अन् झोडा धोरण” राबवले जात आहे. देशातील बहुजनवादी व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे सुनियोजित षडयंत्र राबविण्यात येत आहे. यात ते बव्हंशी यशस्वी झाले आहे. आरक्षणावरून मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी यांना एकमेकांविरुद्ध उभे करण्यात आले आहे. त्यामुळे बहुजनवाद्यांनी सावध राहण्याचे आवाहन अ‍ॅड. पाटील यांनी केले.

हेही वाचा – अत्याचार पीडितेचे छायाचित्र व्हायरल करणे पडले महागात, महिला डॉक्टरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

हेही वाचा – गोंदिया : बेरडीपार आरोग्यवर्धिनी केंद्र शोभेची वास्तू; पाणी, पक्का रस्ता अन् मनुष्यबळाअभावी लोकार्पणाला मुहूर्तच मिळेना

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक निवडणुका, सरकारचे कृषीविरोधी धोरण व वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि आरक्षणावरून जातीपातीचे व फोडा व झोडाचे राजकारण या गंभीर विषयांवर विचार मंथन करण्यात आले. यामध्ये पदाधिकाऱ्यांनी मते मांडली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasenjit patil criticized the government in the bahujan mukti convention scm 61 ssb
Show comments