नागपूर: भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाचे विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. भारताच्या चांद्रयान-२ ची मोहीम अपयशी झाली होती. तसेच रशियाने लुना २५ मोहीमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि ती मोहीम अयशस्वी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या पार्श्वभूमीवर चांद्रयान मोहीम-३ यशस्वी व्हावी यासाठी श्रद्धाळू लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रार्थना करीत आहेत. कोणी मंदिरात होम हवन करीत होते. तर कोणी गणेश वंदना, आरती, पूजा अर्चना करीत आहेत. अजित पवार गटाचे प्रशांत पवार यांनी चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंग व्हावे म्हणून गणरायाला साकडे घातले. त्यांनी आज सकाळी गणेश टेकडी मंदिरात होमहवन केले. तसेच गणेश वंदना केली.